कारंजात सोयाबीन हमीभाव खरेदीला सुरुवात

११०७ शेतकर्‍यांची नोंदणी

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड, 
Soybean purchase at guaranteed price in Karanjat खुल्या बाजारात सोयाबीनचे दर कोसळत असताना कारंजा तालुयातील शेतकर्‍यांसाठी मोठा दिलासा ठरलेल्या ५३२८ रुपयांच्या हमीभाव खरेदीला आजपासून कारंजा येथील धान्यबाजारात अधिकृत सुरुवात होत आहे. दररोज वाढणारा उत्पादन खर्च, अनियमित पाऊस आणि व्यापार्‍यांचा दबाव यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकर्‍यांना या खरेदीतून मोठा आधार मिळणार आहे.
 

Soybean purchase at guaranteed price in Karanjat 
 
 
कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात हा खरेदी शुभारंभ १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आ. सई डहाके यांच्या हस्ते काटापूजन करून करण्यात आला. यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष देवेंद्र पाटील ताथोड, उपाध्यक्ष वसंत लळे, व्यवस्थापक आशिष ठाकरे व सर्व सन्माननीय संचालकांची उपस्थिती होती. सध्या खुले बाजारात सोयाबीनला ३८०० ते ४१०० रुपये इतकाच दर मिळत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रति क्विंटल १२०० ते १४०० रुपयांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हमीभावावर सोयाबीन विक्रीकडे वळत आहेत.
 
 
हमीभावावर विक्रीसाठी ११०७ शेतकर्‍यांची अभासी नोंदणी पूर्ण झाली आहे. हा आकडा तालुयातील हमीभावावरील वाढता विश्वास स्पष्ट करणारा आहे. केंद्राकडून शेतकर्‍यांना मोजणीसाठी संदेश पाठवण्यात येतील. संदेशात दिलेल्या तारखेप्रमाणेच शेतकर्‍यांना सोयाबीनसह केंद्रावर हजर राहावं लागणार आहे.खुल्या बाजारातील घसरलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर हमीभाव खरेदी ही शेतकर्‍यांसाठी आधारवड ठरतेय. १२००—१४०० रुपयांच्या फरकाचा दिलासा म्हणजेच या हंगामात शेतकर्‍याला उभं करू शकणारा हातभार असून खरेदीच्या शुभारंभाने तालुयातील शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.