ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र!

चाकणमध्ये स्थानिक निवडणुकीत अनपेक्षित घडामोड

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
पुणे,
Thackeray-Shinde's Shiv Sena united शिवसेना पक्षातील फूटानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात तणाव निर्माण झाला होता, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली आहे. चाकणमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेची एकत्रित उपस्थिती नोंदली गेली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरताना ठाकरेचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.
 

thakre sinde 
बाबाजी काळे यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे, ज्यामध्ये त्यांच्या पत्नी मनीषा गोरें नगराध्यक्षपदी उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, राजकारण बाजूला ठेवून, दिवंगत आमदारांना आदरांजली म्हणून केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा देण्यात आला आहे, त्यामुळे ही युती मानली जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित सहकार्य दिसेल, तर तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीमध्ये पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे बाबाजी काळे यांनी सांगितले.
 
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात, शिंदे यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांना कानपिचक्या दिल्या. काही नगरसेवकांनी आमदारांकडे तिकिट मिळवण्याच्या प्रयत्नांबाबत तक्रारी केल्या होत्या. शिंदे म्हणाले की, तुम्ही तुमच्या निवडुकांसाठी प्रामाणिकपणे काम केले आहे, आता तुमची जबाबदारी आहे की त्यांना निवडून आणा. कोणालाही पश्चाताप वाटू नये. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आपल्या माणसांचा पाठिंबा ठोस असावा. पालिका निवडणुकीत कामावर लक्ष केंद्रित करा, कोण एकत्र येत आहे याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी इशारा दिला की, त्यांचे लक्ष सर्व ठिकाणी आहे आणि पक्ष मोठा झाल्यास स्वतःसुद्धा मोठे होणार आहेत.