जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेला सुरूवात

    दिनांक :17-Nov-2025
Total Views |
वर्धा,
Wardha leprosy detection campaign जिल्ह्यातील आठ तालुयातील व शहरी भागात १३०४ चमूव्दारे नवीन कुष्ठरुग्ण शोध मोहिमेला १७ नोव्हेंबर रोजी सुरूवात झाली आहे. या शोध मोहिमेसाठी आशा सेविका, पुरुष स्वयंसेवक, आरोग्य सेवकांचे काम योग्य प्रकारे होते की नाही यावर देखरेख करण्याकरिता पर्यवेक्षकांची नियुती करण्यात आलेली आहे. तसेच माहिमेकरिता आढावा व देखरेखीकरिता राज्यस्तरीय चमू डॉ. सचिन एडके यांनी भेट दिली.
 

Wardha leprosy detection campaign 
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये १४ लाख ८२ हजार ३१९ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये शहरी भागातील ३३ लाख ९३ हजार ६४ व ग्रामीण भागातील ११ लाख ४२ हजार ९५५ नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. महिलांची तपासणी आशा स्वयंसेविका तसेच पुरुषांची तपासणी पुरुष स्वयंसेवक करणार आहेत. सर्वेक्षण करण्याबाबत चमूंना कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. चमू आपले काम योग्यरित्या करते की नाही यावर देखरेख करण्यासाठी २५९ पर्यवेक्षकांची नियुती करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी नगर परिषद क्षेत्रामध्ये घंटागाडी आणि बसस्थानक येथे ऑडिओ लीप व्दारे कुष्ठरोगाबाबत संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. तसेच एप्रिल २०२५ ते ऑटोबर २०२५ पर्यंत १९० नवीन रुग्ण जिल्ह्यामध्ये निदान झाले आहे. सदर मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त नवीन रुग्ण नोंद होण्याची शयता