बँक मॅनेजरची 24.50 लाखांची ऑनलाइन फसवणूक

- सायबर गुन्हेगारांनी पाठवले बनावट दस्तावेज

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
bank-manager-cheated-online लकडगंज पाेलिस ठाण्याच्या हद्दीत वर्धमान नगर येथील युनियन बँकेच्या व्यवस्थापक यांनाच लक्ष्य करत अज्ञात सायबर गुन्हेगारांनी तब्बल 24 लाख 50 हजार रुपयांनी फसवले. घटना समाेर आल्यावर बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सायबर गुन्हेगाराने बनावट दस्तावेज पाठवून ही फसवणूक केल्याचे समाेर आले.
 
 
bank-manager-cheated-online
 
तक्रारदार अरुण कुमार गाेपाललाल शर्मा, हेे युनियन बँक वर्धमान नगर शाखेचे व्यवस्थापक आहेत. 30 ऑक्टाेबर 2025 राेजी काही अज्ञात व्यक्तींनी स्वतःला बँकेचे ग्राहक म्हणून दर्शवत त्यांच्याशी प्रथम माेबाइलवर आणि नंतर ई-मेलद्वारे संपर्क साधला. आराेपींनी एका कंपनीच्या नावाने अत्यंत हुबेहुब बनावट कागदपत्रे ई-मेलद्वारे पाठवली. ही कागदपत्रे पहिल्या नजरेत काेणालाही खरी वाटावी, अशी तयार करण्यात आली हाेती. bank-manager-cheated-online याच दस्तऐवजांच्या आधारे आराेपींनी आरटीजीएसद्वारे 24.50 लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले. नंतर शाखा स्तरावर कागदपत्रांची पडताळणी केली असता कागदपत्रे आणि संपूर्ण व्यवहारच अवैध असल्याचे समाेर आले. रक्कम ज्या खात्यात पाठवण्यात आली ते खाते ‘एम. डी. रिजवान’ नावाच्या व्यक्तीचे असल्याचे समाेर आले आहे. मात्र, त्याविषयी काेणताही धागा मिळालेला नाही. आराेपींनी बनावट ई-मेल आयडी आणि बनावट माेबाइल नंबरचा वापर करून स्वतःला बँकेचा ग्राहक दाखवले आणि फसवणूक केली.
बँकेतील पैसेसुद्धा असुरक्षित
पाेलिस तांत्रिक विश्लेषणाद्वारे आराेपींचे डिजिटल पुरावे शाेधत आहेत. प्राथमिक तपासात ही टाेळी सायबर ्राॅड करणारी असून आतापर्यंत अनेक बँक अधिकाèयांना त्यांनी जाळ्यात ओढले असल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला आहे. नागपुरातील या हाय-प्राेाइल फसवणुकीने शहरातील बँकिंग आणि सायबर सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.