नागपूर,
maafsu-skb-pharmacy-college महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूर आणि श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी यांच्यात शैक्षणिक व आंतरशाखीय संशोधन सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. पाच वर्षांसाठी लागू असलेला हा करार दिणक १५ नोव्हेंबर रोजी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या नॅशनल वन हेल्थ यूथ कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्रात औपचारिकरित्या विनिमय करण्यात आला.

या कराराचा मुख्य उद्देश संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना देणे, ज्ञानविनिमय वाढविणे आणि दोन्ही संस्थांच्या संशोधन क्षमतेस बळकटी देणे हा आहे. औषधनिर्माण शास्त्र, पशुआरोग्य, जैवतंत्रज्ञान व संबंधित विज्ञान शाखांमध्ये नवकल्पनांना चालना मिळावी, प्रगत प्रयोगशाळा सुविधा, प्रशिक्षण कार्यक्रम आणि क्षमता-वृद्धी उपक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावेत, यासाठी हे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. maafsu-skb-pharmacy-college समारंभाचे अध्यक्ष माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन व्ही. पाटील होते. डॉ. आर. आर. बी. सिंह, डॉ. एस. बी. बारबुद्धे, डॉ. नवीन कुमार, डॉ. प्रज्ञा यादव, डॉ. मिलिंद उमेकर तसेच माफसूचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. या करारामुळे संयुक्त संशोधन प्रकल्प, तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण, सामायिक संशोधन निष्कर्षांचे प्रकाशन आणि विद्यार्थ्यांसाठी प्रायोगिक शिक्षणाच्या नव्या संधी उभ्या राहणार असल्याचे डॉ. पाटील आणि डॉ. उमेकर यांनी सांगितले. वन हेल्थ दृष्टिकोनाच्या महत्त्वावर आधारित चर्चासत्रांनीही उपस्थितांची प्रशंसा मिळवली.