चारचाकीची चार विद्यार्थ्यांना धडक, दुचाकीलाही नेले फरफटत

जखमींवर सावंगी आणि सामान्य रुग्णालयात उपचार सुरू

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
वर्धा, 
wardha accident बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी कॉलेजच्या वसतिगृहातील चार विद्यार्थी जेवण आटोपून शैक्षणिक साहित्याची खरेदी करण्यासाठी पिपरी येथे पायदळ जात असताना वर्धेकडून पिपरी मार्गे जाणार्‍या भरधाव कारने चौघांना जबर धडक दिली. तसेच एका दुचाकीलाही फरफटत नेले. यात चार विद्यार्थी जखमी झाले असून एकावर सावंगी तर तीन विद्यार्थ्यांवर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना १५ रोजी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

wardha accident 
 
 
 
प्रेम चोपडे (२०) रा. नांदुरा जि. बुलढाणा, हर्ष तिडके (२०), सार्थक सोनवणे (१९), श्रेयस बोडे (१९) आणि प्रशिक गेडाम (२०) हे विद्यार्थी पिपरी मेघे येथील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेनॉलॉजी कॉलेजच्या वसतिगृहात राहतात. शनिवारी जेवण आटोपल्यानंतर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी वसतिगृहाच्या बाहेर निघाले. मुख्य रस्त्यावर आल्यानंतर पायदळच पिपरीकडे जात असताना वर्धेकडून एक भरधाव कार आली आणि हर्ष तिडके, सार्थक सोनवणे, श्रेयस बोडे आणि प्रशिक गेडाम यांना जबर धडक दिली. सोबतच एका दुचाकीलाही फरफटत नेत पसार झाला.wardha accident घटना लक्षात येताच नागरिकांनी धाव घेत चारही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. प्रशिक गेडाम हा गंभीर असल्याने त्याला सावंगी मेघे रुग्णालयात हलविले तर इतर तिघे किरकोळ जखमी असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. याप्रकरणी तक्रारीवरून अज्ञात कार चालकाविरुद्ध रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.