नागपूर,
lecture-by-urmila-pawar डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व विचारधारा विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठतर्फे प्रख्यात लेखिका व विचारवंत उर्मिला पवार यांचे डॉ. आंबेडकर स्मृती व्याख्यान आयोजित आले आहे. हे व्याख्यान शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाराजबाग समोरील दीक्षांत सभागृहात होणार आहे.

‘आम्ही ही इतिहास घडविला’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका उर्मिला पवार यांनी दलित साहित्य, नाटक, कथा-कविता, आत्मकथन व समीक्षा या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. lecture-by-urmila-pawar आयदान, निळं आमखं सावंतिलं, माझ्यास एक प्रवास, बूट, चौथी भिंत यांसारखी अनेक पुस्तके, कथासंग्रह, नाटके व भाषांतरे नावावर आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी व्याख्याने, भाषांतर कार्यशाळा व साहित्यिक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदविला असून, त्यांच्या साहित्याचा समावेश मुंबई, नागपूर, नॉटिंगहॅम (इंग्लंड) व जर्मनीतील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले विद्यार्थी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे विभागप्रमुख डॉ. अविनाश फुलझेले यांनी केले आहे.