भंडारा,
weightlifting-national-championship 35 व्या राष्ट्रीय स्ट्रेंथ लिफ्टिंग बेंच प्रेस चॅम्पियनशिप मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत भंडारा येथील सुरजसिंग ठाकूर याने दोन कांस्यपदक पटकावले आहेत.
इंडियन स्ट्रेंथ लिफ्टिंग फेडरेशन सिक्कीम स्ट्रेंथ लिफ्टिंग फेडरेशनच्या वतीने गंगटोक येथे 35 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुरज ठाकूर यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. राज्यस्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये सूरज याने दोन सुवर्णपदक पटकावले होते. weightlifting-national-championship राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाचे प्रदर्शन करीत त्याने देशासाठी दोन कास्यपदक मिळवून मान वाढविला. भंडारा येथील रहिवासी असलेल्या सुरज च्या या कामगिरीमुळे जिल्ह्याचे नाव चमकले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.