नागपूर,
Nagpur News महाराष्ट्रातील अस्मिता खेलो इंडिया अंतर्गत आयोजित महिला क्रीडा स्पर्धेचे भव्य आणि यशस्वी आयोजन उत्साहात पार पडले. महिला क्रीडापटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचे प्रेरणादायी व्यासपीठ या स्पर्धेमुळे उपलब्ध झाले. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना आपली गुणवत्ता सक्षमपणे सादर करण्याची संधी मिळते.
स्पर्धेतील सर्व व्यवस्थापन अत्यंत सुयोग्य आणि प्रशंसनीय होते. स्पर्धकांसाठी सुरक्षित, अनुकूल आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यात आयोजन समितीने उत्तम कामगिरी केली असून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत आमच्या “लेडी लॉयर्स टीम” ने उत्साहपूर्वक सहभाग घेतला. Nagpur News टीमसाठी हा अनुभव प्रेरणादायी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांमध्ये संपूर्ण समर्पण आणि जोमाने सहभागी होण्याचा आमचा निर्धार आहे. महिलांच्या सशक्तीकरणाला नवी दिशा देणाऱ्या अशा स्पर्धा केवळ क्रीडा क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांना प्रगती करण्यासाठी प्रेरणा देतात.
सौजन्य: स्मिता दीक्षित, संपर्क मित्र