सुकमा,

गुप्तचरांकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार, एका सुरक्षित ठिकाणी कारवाईच्या वेळी तो त्याच्या पत्नीसोबत एका खोलीत झोपला होता. naxalite-hidma-killed माहिती मिळताच दलांनी परिसराला गुपचूप वेढा घातला. सुरुवातीला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले, मात्र त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केल्याने परिस्थिती चकमकीत परिवर्तित झाली. फक्त दोन तासांत दलांनी सर्व मार्ग बंद करत अचूक कारवाई केली आणि हिडमा त्याच्या पत्नी राजेसह सहा नक्षलवादी ठार झाले. हिडमा नक्षल चळवळीतील सर्वात गूढ आणि क्रूर चेहऱ्यांपैकी एक मानला जात होता. २०१० च्या दंतेवाडा हल्ल्यात ७६ जवानांचा बळी, २०१३ च्या झिरम व्हॅली हल्ल्यात ३२ जणांचा मृत्यू, २०१७ सुकमा हल्ला, तसेच २०२१ मधील विजापूरची मरणयात्रा—अशा अनेक रक्तपातांच्या मागे त्याचाच मेंदू होता. त्याच्या दहशतीने गेल्या दशकभरात १५० पेक्षा जास्त जवानांचे प्राण गेले.
हिडमाची खरी ओळख आणि स्वरूप याबाबतचे रहस्य आजही अनेकांना गोंधळात टाकणारे होते. विविध छायाचित्रे उपलब्ध असली तरी त्याची निश्चित ओळख सांगणे पोलिसांसाठी अवघडच राहिले. naxalite-hidma-killed मात्र या कारवाईनंतर नक्षलवाद्यांच्या दक्षिण बस्तर–सुकमा–विजापूर पट्ट्यातील सर्वात महत्त्वाचा आणि धोकादायक दुवा तुटला असून सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.