मेडिकलमधील रूग्णांच्या सेवा सुविधांची माहिती द्या

- उच्च न्यायालयाच्या डीनसह पीडब्ल्यूडीला आदेश

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-medical-facilities मेडिकलधील रूग्णांच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या शेडसंदर्भातील सेवा सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक आठवड्यात पीडब्ल्यूडी आणि मेडिकलच्या अधिष्ठात्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. साेमवारी याचिकेवर न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि न्यायमूर्ती रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली असता त्यांनी वरील आदेश प्रतिवादींना दिलेत.
 
 
nagpur-medical-facilities
 
मेडिकलमध्ये बांधण्यात आलेल्या शेडमध्ये (वेटींग रूम) काेणाला प्रवेश देण्यात येणार आहे. त्यात काेणत्या सेवा सुविधा राहणार आहेत. याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. रुग्णाचे नातेवाईक झाडाखाली थांबतात आणि इतर व्यक्ती शेडमध्ये असतात, शेडची देखभाल काेण करताे, अशी विचारणा न्यायालयाने करून एका आठवड्यात सर्व माहिती रेकाॅर्डवर मागविली आहे. nagpur-medical-facilities मेडिकलमधील अंतर्गत रस्त्यांची माहितीही न्यायालयाने मागितली आहे. कॅन्सर उपचाराचे हाय एनर्जी लिनियर एक्सेलेरेटर मशिन स्थापित करण्यासाठी अटी व शर्थींसह नवीन टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती हायकाेर्टाला शासनाने दिली आहे. विदर्भातील सरकारी रुग्णालयांच्या विकासासंदर्भात जनहित याचिका प्रलंबित आहे. शासनार्ते अ‍ॅड. िफरदाेस मिर्झा, अ‍ॅड. दीपक ठाकरे , एमएमआरडीएर्ते अ‍ॅड. सुधीर पुराणीक यांनी बाजू मांडली.
कँसर रूग्णालयासाठी निधी द्या
राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज कँसर रूग्णालयासाठी उर्वरित 48 काेटी रूपये डीनच्या खात्यात जमा करावे, असे निर्देश राज्य शासनाला द्यावेत, अशीही मागणी अ‍ॅड. गिल्डा यांनी केली आहे. निधी अभावी कँसर रूग्णालयाचे बांधकाम व इतर कामे रखडली आहे, असे अ‍ॅड. गिल्डा यांचे म्हणणे आहे.