police-arrest-youth-for-mds-fake-crime नागपूर पाेलिस दलातील एका पाेलिस अधिकाèयाने व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी भंडारा येथील हाॅटेल व्यावसायिक युवका कारमध्ये काेंबून नागपुरात आणले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत अंमली पदार्थ टाकून युवकाला एमडी तस्करीच्या खाेट्या गुन्ह्यात गाेवले. या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत पिडीताच्या कुटुंबियांनी पत्रपरिषद घेऊन थेट पाेलिसांवर आराेप केले. अर्पण मनिष गाेस्वामी असे त्या युवकाचे नाव आहे.
अर्पण गाेस्वामी यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार, नागपूर पाेलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विराेधी पथकातील 13 अधिकारी आणि कर्मचाèयांनी अर्पण गाेस्वामी याला आधी 30 मे 2025 ला भंडारा येथून बळजबरीने ब्रेझा कारमध्ये बसवले. पथकाने सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी भंडारा येथील टाेल नाका ओलांडताना वाहनाची बदली केली. अर्पण गाेस्वामीची स्कूटर घेऊन दाेन पाेलिस कर्मचाèयांनी भंडारा टाेल नाका ओलांडला. police-arrest-youth-for-mds-fake-crime या स्कूटरच्या नंबर प्लेटला चिखल ासून ही दुचाकी 12 वाजून 16 मिनिटांनी बसस्थानक परिसरातील राहूल काॅम्प्लेक्स येथे लावली. इथे गाेस्वामी याच्या दुचाकीच्या डिक्कीत एमडी पदार्थाचे पार्सल टाकण्यात आले. एनडीपीएस पथकाने गणेशपेठ पाेलिस हद्दीत बनावट घटनास्थळ तयार करत अर्पण गाेस्वामी याला अंमली पदार्थ तस्करीत गाेवले असा थेट आराेपही पाेलिसांवर करण्यात आला. पाेलिस अधिकारी गुल्हाणे आणि त्यांच्या पथकावर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी यावेळी गाेस्वामी कुटुंबियांनी पत्रपरिषदेत केली.