प्रशांत किशोर यांची मौन उपोषणातून ‘नवी सुरुवात’

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
पाटणा,
Prashant Kishor's new beginning २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुरज पक्षाला मोठा धक्का बसल्यानंतर प्रशांत किशोर यांनी अखेर मौन तोडत आपल्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. पाटण्यातील पाटलीपुत्र गोलंबर येथील जनसुरज कॅम्पमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी सांगितले की पक्षाच्या अपयशासाठी ते स्वतः १०० टक्के जबाबदार आहेत आणि जनतेचा विश्वास मिळवण्यात ते अपयशी ठरले. त्यांनी स्पष्ट केले की पक्षातील कार्यकर्त्यांनी मनापासून प्रयत्न केले, मात्र निवडणुकीच्या चुरशीमध्ये संघटना आवश्यक त्या उंचीवर पोहोचू शकली नाही.
 
 

प्रशांत किशोर 
पराभवानंतरच्या आत्मपरीक्षणाचा भाग म्हणून पीके यांनी दोन दिवसांनी भिताहरवा आश्रमात एक दिवसाचे मूक उपोषण करण्याची घोषणा केली. हे उपोषण त्यांनी वैयक्तिक शिस्त, मनन आणि भविष्य सुधारण्याच्या संकल्पाशी जोडले. “आपण चुकी केली असेल, पण पाप नाही; कोणाच्याही विश्वासाला तडा दिला नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी कार्यकर्ते आणि समर्थकांना इच्छेनुसार त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन केले, मात्र ते अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केले.
 
 
पत्रकार परिषदेत पीके यांनी निवडणूक पराभवानंतर सक्रिय राजकारणातून बाहेर पडतील, अशा चर्चांना पूर्णविराम दिला. काहींना वाटते की मी बिहार सोडेन किंवा राजकारणापासून दूर जाईन, पण माझा निश्चय अढळ आहे. बिहारच्या बदलासाठीचा माझा संकल्प कायम आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आगामी काळात जनसुरज पक्ष बूथ आणि पंचायत पातळीवर संघटनात्मक आढावा घेणार असून, तळागाळातील संवाद आणि सर्व्हे अधिक प्रभावी केले जातील. पीके यांनी स्पष्ट केले की निवडणुकीत मिळालेला पराभव म्हणजे चळवळीचा अंत नाही; उलट हा अनुभव पुढील प्रवासासाठी नवी दिशा देणारा आहे.