लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर बलात्कार; प्रियकराला अटकपूर्व जामीन मंजूर

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
rape-of-girlfriend शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आराेपी युवकाला अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला. वैभव मुरली मेलकाेटे (27, बंजारीनगर) असे आराेपीचे नाव आहे.
 
rape-of-girlfriend
 
मिळालेल्या माहितीनुसार, वैभव मेलकाेटे याचे स्टाॅक मार्केटचे प्रशिक्षण क्लासेस आहेत. त्याच्या क्लासमध्ये 17 वर्षांची तरुणी प्रशिक्षण घेत हाेती. पीडित विद्यार्थिनीची यादरम्यान वैभवशी ओळख झाली. त्याने तिला शेअर मार्केट शिकवले. यादरम्यान, दाेघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले. rape-of-girlfriend विश्वासात घेत आराेपीने तिला आपल्या मित्राच्या घरी नेले. तिथे त्याने विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दाेघांनी अनेकदा संबंध ठेवले. यादरम्यान, तरुणीच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. तरुणीने आईवडिलांना याबाबत माहिती दिली. त्यामुळे कुटुंबीयांनी अजनी पाेलिसांकडे धाव घेतली. अजनी पाेलिसांनी आराेपी वैभवविराेधात पाेस्काे कायदा व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने अ‍ॅड. पवन ढेंगे यांच्यार्माफत न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीला अटकपूर्व जामीन देण्यासाठी जोरदार विरोध केला. न्यायालयाने आराेपीची आणि पीडितेची बाजू ऐकून घेऊन आराेपी वैभवला अटकपूर्व जामीन मंजूर केला. अ‍ॅड. पवन ढेंगे ढेगे यांनी आरोपीची बाजू मांडली