लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचा लैंगिक छळ

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
sexual-harassment एका लग्नात भेट झाल्यानंतर तरुणी आणि तरुणाचे सूत जुळले. लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, सातत्याने लैंगिक छळ करून नंतर लग्नास नकार दिल्यामुळे तरुणीने पाेलिसांत तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रकाश पुरुषाेत्तम बाहेकर (26) सुभाषनगर, कामगार काॅलनी यास अटक केली.
 
 
sexual-harassment
 
पीडित 26 वर्षीय तरुणी ही मुळची भिवापूरजवळील एका खेडेगावात राहणारी आहे. नागपुरात ती सेल्स गर्ल म्हणून काम करते. आराेपी प्रकाश बाहेकर हा देखील एका दुकानात काम करताे. 2016 मध्ये एका नातेवाईकाच्या लग्नात त्यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली आणि प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर प्रकाशने तिला आपण लग्न करू आणि सुखाचा संसार करू असे आमिष दाखविले. 30 मे 2023 ते 12 नाेव्हेंबर 2025 राेजी तिला वारंवार हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तरुणीने त्याला लग्नाविषयी विचारणा केली असता ताे टाळाटाळ करू लागला. sexual-harassment 12 नाेव्हेंबर राेजी तरुणीने त्याला शेवटचे विचारले असता त्याने लग्नास नकार देऊन तिला मारहाण केली. त्याचप्रमाणे जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून प्रतापनगर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपी प्रकाश यास अटक केली. त्याची 19 नाेव्हेंबरपर्यंत पाेलिस काेठडी घेण्यात आली. पाेलिस उपनिरीक्षक मनाेहर दंदाळे पुढील तपास करीत आहेत.