रेल्वे बर्थवरून चिमुकला खाली पडला

आईच्या आक्रोशाने प्रवाशी झाले सुन्न, केरळ एक्सप्रेसमध्ये स्तब्ध करणारी घटना

    दिनांक :18-Nov-2025
Total Views |
नागपूर,
toddler-falls-off-kerala-express-train-berth केरळ एक्सप्रेसच्या बर्थवरून पालकाच्या दुर्लक्षतेमुळे दीड वर्षाचा चिमुकला खाली पडला. यामुळे कोचमधील सर्वच प्रवाशांनी मदतीसाठी धावत घेतली. जीव भांड्यात ही घटना रविवारी ट्रेन नंबर १२६२५ केरळ एक्सप्रेसमध्ये घडली. निरागस चिमुकला शांत झाल्याने पालकांनी आक्रोश सुरू केला. मात्र, प्रसंगावधान राखत रेल्वे कर्मचार्‍यांनी तातडीने उपाययोजना केली अन् काही वेळेतच चिमुकला हसू लागला.
 
 
toddler-falls-off-kerala-express-train-berth
 
रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ एक्सप्रेसमधून नागपूर ते ईटारसी प्रवास करीत असलेल्या प्रवासी महिला आपल्या चिमुकल्याला घेऊन वरच्या लेटली होती. तिचे काहीसे दुर्लक्ष झाले आणि तिच्या कुशीतील चिमुकला खाली पडला. यावेळी गाडी भोपाळहून निघाली होती. गाडीची धडधड सुरू असतानाच चिमुकल्याने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली होती. त्याच्या आईचा तर आक्रोश बघवत नव्हता. toddler-falls-off-kerala-express-train-berth डब्यात या घटनेने चिंताग्रस्त वातावरण निर्माण केले. दरम्यान, एका प्रवाशाच्या माध्यमातून रेल्वेच्या रनिंग स्टाफला ही माहिती आली. त्याने प्रसंगावधान राखत भोपाळ रेल्वे कंट्रोलला कळविले. कंट्रोलच्या स्टाफने ईटारसी स्थानकावर घटनेची माहिती देऊन वैद्यकीय मदतीसाठी एक पथक सज्ज ठेवण्यास सांगितले. त्यानुसार, गाडी ईटारसी स्थानकात पोहचताच चिमुकल्यावर तातडीने उपचार करण्यात आले. काही वेळेतच त्याने उपचाराला प्रतिसाद दिला अन् तो हसू लागला.