नवी दिल्ली,

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले, “संध्याकाळी मी एकटाच बसलेला असतो. घरात कोणी नसत. जेवणासाठी मला कधी एका तर कधी दुसऱ्या अनोळखी व्यक्तीवर अवलंबून राहावे लागते. कोणी तरी माझ्यासाठी जेवण आणते, इतकेच घरात कामवाली आणि स्वयंपाकी आहेत, ते जेवण वाढून निघून जातात.” पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “मला माझी आई, माझी मुले, सून, नातवंड सगळेच खूप प्रिय आहेत. पण मी कधी काही मागत नाही. yuvraj-singhs-father मला आता मृत्यूचीही भीती उरलेली नाही. माझे आयुष्य पूर्ण झाल्यासारखे वाटते. देवाला जेव्हा योग्य वाटेल, तेव्हा तो मला घेऊन जाईल. त्याने मला खूप दिले, मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. योगराज सिंह यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीइतकेच गुंतागुंतीचे राहिले आहे. त्यांनी पहिली लग्न शबनम कौर यांच्याशी केली होती, ज्यांच्यापासून त्यांना दोन मुले — युवराज व जोरावर — झाली. सततच्या कौटुंबिक वादांमुळे हे नाते तुटले. युवराजनेही अनेकदा सांगितले आहे की, घरातील अखंड भांडणामुळेच त्याने आई-वडिलांना वेगळे होण्याचा सल्ला दिला.
यानंतर योगराज यांनी नीना बुंदेल (सतबीर कौर) यांच्याशी दुसरे लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना एक मुलगा विक्टर आणि एक मुलगी अमरजोत आहे. yuvraj-singhs-father मात्र, त्यांच्यासाठी सर्वात कठीण क्षण तो होता, जेव्हा शबनम आणि युवराज यांनी घर सोडले. त्या काळातील असहाय्यता आणि तुटलेल्या नात्यांच्या वेदना आजही त्यांना पोखरत असल्याचे त्यांनी सांगितले योगराज सिंह यांच्या या कबुलीजबाबामुळे त्यांच्या आयुष्याच्या अंतर्गत संघर्षांची आणि एकटेपणाच्या कडवट सत्याची पुन्हा एकदा झलक समोर आली आहे.