१४ वर्षीय विद्यार्थी पाच दिवसापासून बेपत्ता

आमिष दाखवून पळवून नेल्याचा नातेवाईकांचा संशय

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
कारंजा लाड,
student missing जिल्ह्यातील सुपखेला येथील सैनीक शाळेत शिक्षण घेणारा १४ वर्षीय शिवम शेषराव भांडे हा विद्यार्थी नागपूर-संभाजीनगर बसमधून प्रवासादरम्यान कुठेतरी बेपत्ता झाला असून, दोन दिवसांच्या शोधानंतरही त्याचा मागमूस न लागल्याने कुटुंबीयांनी कारंजा शहर पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीने मुलाला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
 

स्टुडन्ट missing  
 
 
पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शेषराव महादेव भांडे रा. पारवा कोहर ता. कारंजा हे पुण्यात खाजगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा असून, मुलगा शिवम हा सुपखेला येथील सैनीक शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी आल्यावर काही दिवस काका श्रीकृष्ण भांडे यांच्या घरी, बनदेवी परिसरात राहात होता.१४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता च्या सुमारास काका श्रीकृष्ण यांनी शिवमला कारंजा बसस्थानकातून नागपूर - संभाजीनगर बसमध्ये बसवले. वाशीम बसस्थानकावर दुसरे काका यशवंतराव भांडे हे शिवमला घेण्यासाठी येणार होते. मात्र यशवंतराव यांना नेमकी कोणती बस हे श्रीकृष्ण सांगायला विसरल्याने दुपारपर्यंत प्रतीक्षा करूनही मुलगा मिळू शकला नाही. संध्याकाळी चारपर्यंत बसस्थानकावर थांबूनही शिवम आढळून आला नाही.student missing त्यानंतर कुटुंबीयांनी वाशीम शहरात, सुपखेला सैनीक शाळेत, नातेवाईकांकडे आणि मित्रांकडे शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती न मिळाल्याने त्यांना संशय आला की शिवमला कोणी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले असावे. या संशयावरून शेषराव भांडे यांनी कारंजा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.