वन्यप्राण्यांची शिकार करणारे सक्रिय

- गोळा बारूद स्फोटात म्हैस गंभीर

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
गोंदिया,
wild animals वनपरिसरात वन्यप्राण्यांची अवैध शिकार करणारे सक्रिय झाले आहेत. बारुद असलेला गोळा म्हशीने तोंडात घेताच मोठा स्फोट झाला. यात म्हैस गंभीर जखमी झाली. ही घटना रविवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील घुमर्रा वनपरिक्षेत्राअंतर्गत येणार्‍या घुबेटोला येथे घडली.
 

वन्यप्राणी  
 
माहितीनुसार, घुबेटोला येथील शेतकरी इनकराम रहांगडाले यांच्या शेताला लागून जंगल आहे. जंगलात गाय, म्हशी चरण्यासाठी रविवारी गेल्या होत्या. त्या चरत असताना बारूद गोळा एका म्हशीने तोंडात घेताच स्फोट झाला. या स्फोटात म्हशीचा तोंड फुटला असून, ती गंभीर जखमी झाली आहे.wild animals घटनेची माहिती वनविभागाला होताच सोमवार १७ रोजी वनकर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून तपास केला. गोळा बारुदने म्हैस गंभीर जखमी झाल्याने पशुपालकाचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त पशुपालकाला वनविभागाने तत्काळ आर्थिक मोबदला द्यावा, अशी मागणी आहे.

अज्ञाताने वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी गोळा बारुद ठेवला असेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. घटनेत म्हैस जखमी झाली आहे.
-मनोज गढवे, वनपरिक्षेत्राधिकारी, गोरेगाव