वाचनाची प्रेरणा उजाळली, विद्यार्थ्यांसोबत ग्रंथालय भेट !

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Bhauji Daftari School तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड रुजावी या उद्देशाने भारतीय शिक्षण मंडळाच्या सहसचिव, ऋचा हळदे यांनी भाऊजी दफ्तरी शाळा, महाल येथील ५ वी ते ७ वीतील विद्यार्थ्यांना घेऊन हनुमान नगर सार्वजनिक ग्रंथालयाला भेट दिली.ग्रंथपालआणि लिपिक यांनी मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके निवडून दिली. वाचनाचा आनंद घेत मुलांचे चेहरे आनंदाने उजळले.
 

bhau

 
 
या उपक्रमामुळे वाचनालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि बालदिन यांचा उत्साही माहोल अनुभवता आला.मुख्याध्यापिका जान्हवी ठेमदेव,Bhauji Daftari School उपमुख्याध्यापिका सारिका कैकाडे व शिक्षिका श्रवरी आरोकर आणि अर्चना परसोडकर यांचीही उपस्थिती लाभली.विशेष म्हणजे, शाळेतील शिक्षकांनी सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व स्वीकारून वाचन संस्कृतीला प्रोत्साहन दिले.
सौजन्य:संदीप तिजारे,संपर्क मित्र