समुद्रपूर,
cotton growers बीन शेतकर्यांच्या हातून निघून गेले. कापूस व तुर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी या निर्सगाच्या कोपामुळे हवालदिल झाला. पावसाच्या प्रकोपातून वाचलेले कपाशीचे पीक थोडंफार शेतकर्यांच्या हातत येत नाही तोच खुल्या बाजारात कापासचे दर कमी आहे. यामुळे शेतकर्यांचा कापूस विक्रीचा कलह सीसीआयकडे असतानाच सीसीआयीच्या कापूस खरेदीच्या जठील अटी कापूस उत्पादक शेतकर्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे सरकारने लक्ष देऊन अटी शिथिल करून दिलासा द्यावा अशी मागणी सरपंच संघटनेसह शेतकरी करीत आहे.
सीसीआयीची यंदा कापूस खरेदीची एकरी ६ क्विंटल ४२ किलो मर्यादा मागल्या वर्षीच्या तुलनेत तेही कमी आहे. यातच १२ टयाच्या ओलाव्याची मर्यादा असुन सीसीआयीला कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. यंदा एकीकडे कापसाच्या पिकाला निसर्गाने धूऊन काढले असताना दुसरीकडे शासनाकडून सुद्धह जखमेवर मिठ चोळण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन गेले कापसावे वाटोळे झाले आहे. सरकारने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई मदतीचे पॅकेज जाहीर केले. शेतकर्यांच्या खात्यात हेटर ८ हजार ५०० रुपये व १० हजार रुपये रब्बीच्या बियाण्याने खरेदीसाठी जमा केले. या मदतीमुळे शेतकर्यांना आर्थिक दिलास मिळाला असला तरी शेतकर्यांची आर्थिक अडचण तसीच आहे. आता कापूस पिकावर शेतकर्यांची आशा असतानाच सीसीआयीची कापूस खरेदी शेतकर्यांच्या अडचणीत भर पडत आहे.cotton growers त्यामुळे कापूस उत्पादक शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी गांभीर्याने लक्ष देऊन सीबीआयने कापूस खरेदीची एकरी मर्यादा कमीत कमी १० क्विंटल करावी तसेच १२ टक्के ओलाव्याची मर्यादा २० टयांपर्यंत करावी, ऑनलाईन नोंदणी प्रक्रीयेमध्ये सुधारणा करून सुलभ करावी अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष धर्मेंद्र राऊत जिल्हा, सचिव सचिन गावंडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख विलास नवघरे, किशोर नेवल, रेणुका कोटबंकर, राजू नौकरकर, मुरलीधर चौधरी, जगदीश वरटकर, जगदीश संसारीया, राजेश्री गावंडे, गजानन भोरे, संदीप डोबले, धिरज लेंडे, प्रतिभा माऊसकर, संगीता डेकाटे, प्रज्वल येडे, देवेंद्र बुके, अंकीत कावळे, प्रशांत कठीणे, सतिश ठाकरे, संजय ढोमणे, जगदीश संसारी, संतोष सेलूकर, आदींसह शेतकरी व जिल्ह्यातील सरपंचांनी केली आहे.