देवळी,
deoli municipal council देवळी नगरपरिषदेत आज १८ रोजी नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. यात अध्यक्षपदाकरिता २ अर्ज तर सदस्यपदाकरिता ३ अर्जांना अपात्र ठरविण्यात आले.
निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे अर्ज बाद करण्यात आले. यामध्ये अध्यक्ष पदाकरिता नरेंद्र मदनकर यांचा दोन अर्जा पैकी एक अर्ज व प्रांजली वैद्य यांचे तर सदस्य पदाकरिता अनुराधा उटाने (प्रभाग १ ब ), विद्या झीलपे ( प्रभाग ८ अ), रवींद्र करोटकर (प्रभाग ८ ब) यांचे नामनिर्देशन पत्र बाद करण्यात आले. छाननीनंतर पात्र अर्जांची नावे अधिकृत यादीनुसार जाहीर केली जाणार आहेत.deoli municipal council दरम्यान, छाननीनंतरची स्थिती पाहता देवळीतील निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक प्रभागांमध्ये आता बहुकोनी लढतीचे संकेत मिळत असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.