ड्रग्ज व लैंगिक उत्तेजनाच्या गोळ्या घेत बनवायचा संबंध आणि....

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
महोबा
Drugs and sexual stimulants महोबा जिल्यातील किरण देवी हत्याकांडाने संपूर्ण प्रदेश हादरला आहे. सीआरपीएफ जवान विनोद सिंगची पत्नी असलेल्या किरणचे वैवाहिक आयुष्य सुरळीत नव्हते. सातत्याने होणाऱ्या वादावादांमुळे तिने आपल्या पती आणि सासरच्या मंडळींवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी काब्राई पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अंकित यादव करीत होते. चौकशीदरम्यान किरणचा अंकितशी संपर्क वाढला आणि इथूनच तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले जे शेवटी तिच्या मृत्यूचं निमित्त ठरलं.
 
 
Drugs and sexual stimulants
 
किरण आणि अंकित यांच्यातील संबंध दोन वर्षांहून अधिक काळ एकत्र होते. किरण अंकितच्या प्रेमात गुंतली होती आणि त्याच्याशी लग्न करण्याचा निर्धार तिने केला होता. तिने या विवाहासाठी अंकितवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. तथापि, अंकितला हा संबंध सार्वजनिक होण्याची भीती होती आणि लग्नाचे टाळाटाळ सुरुच होते. किरणचा आग्रह वाढताच अंकितने तिच्यापासून सुटका करण्याचा निर्णय घेतला.
 
 
१२ नोव्हेंबर रोजी अंकितने एका ओळखीच्या व्यक्तीकडून कार उधार घेतली आणि किरणला फिरायला बोलावले. किरणही त्याच्यासोबत आनंदाने निघाली. प्रवासादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली, वाद झाले आणि तणावही वाढला. तपासात उघड झाले की, अंकितने आधी ड्रग्ज व लैंगिक उत्तेजक गोळ्या घेतल्या होत्या आणि त्यानंतर कारमध्ये अनेक वेळा त्याने किरणसोबत संबंध ठेवले. वाद चिघळल्यानंतर अंकितने किरणला शहराबाहेरील एक निर्जन शेतात नेले. तिथे तणाव पराकाष्ठेला पोहोचताच त्याने लोखंडी रॉडने किरणची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने किरणचा मृतदेह नग्न अवस्थेत तिथेच फेकून दिला, जेणेकरून हा गुन्हा ‘अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार आणि खून’ असा वाटावा. स्वतःच्या पापाचं रूपांतर वेगळ्या गुन्ह्यात करण्याचा हा त्याचा प्रयत्न होता.
मात्र, पोलिसांना गाफील ठेवणं अंकितसारख्या अधिकारीलाही शक्य झालं नाही. मृतदेहाची ओळख पटताच तपास वेगाने पुढे गेला. तांत्रिक पुराव्यांचा बारकाईने अभ्यास करताना पोलिसांना कारचे लोकेशन, दोघांमधील मोबाईल चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांचा ठोस आधार मिळाला. गुन्ह्यात वापरलेली कार आणि लोखंडी रॉडही जप्त करण्यात आली. या सर्व पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी इन्स्पेक्टर अंकित यादवला अटक केली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवले. एकेकाळी किरणला आश्रय देणारी आणि तिच्या तक्रारीची चौकशी करणारी व्यक्तीच तिचा जीव घेईल, हे कुणालाही कल्पना नव्हते. फसवणूक, लालसा, वासना आणि सामर्थ्याचा गैरवापर यांचं भीषण मिश्रण ठरलेलं हे प्रकरण समाजाला हादरवून सोडणारं ठरलं आहे.