नागपूर,
Green city Nagpur- हिरवे शहर म्हणून नागपूरची देशभरात ओळख आहे ती केवळ नावापुरती नाही. काही ठिकाणी झाडांची कत्तल होऊन निसर्गाचा र्हास होत असला, तरीही शहरातील काही भाग आजही हिरवाईची परंपरा जपून ठेवतात. त्यात सेमिनरी हिल हा हिरवागार परिसर विशेष उठून दिसतो.
या टेकडीवरील डौलदार रस्ता जणू एखाद्या नैसर्गिक जंगलातूनच जात असल्याची अनुभूती देतो. Green city Nagpur- दाट झाडी, शांत वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्याचा वलय यामुळे हा परिसर प्रत्येकाला मोहवून सोडतो. नागपूरचा हा हिरवा श्वास शहराची खरी ओळख आजही जिवंत ठेवतो.
सौजन्य:सारंग टोपरे,संपर्क मित्र