नागपूर,
Indira Gandhi Jayanti माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज मेजर हेमंत जकाते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड कॉमर्स, म्हाळगी नगर चौक येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मधुसूदन मुडे होते. आयोजिकांमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शिला मुडे, कॉलेजच्या उपमुख्याध्यापिका भारती मानकर आणि प्राध्यापिका सुधा नासरे यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर आधारित मनोगत सादर केले, तर शिक्षकांनी त्यांच्या जीवनचरित्र आणि कार्याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाची प्रस्तावना हर्षा चन्नावार यांनी केली, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन उज्वला नासरे यांनी केले.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र