दोन तासांच्या थरारानंतर नागपूरमध्ये बिबट्याचे रेस्क्यू!

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
मुंबई,
Leopard rescue in Nagpur घराच्या आत लपून बसलेल्या बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. परिसर अत्यंत दाट आणि गर्दीने भरलेला असल्याने प्रारंभी पथकाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. उत्सुकतेपोटी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने बिबट्याला आणखी अस्वस्थता येत होती. सुमारे दोन तास सततच्या प्रयत्नांनंतर अखेर पथकाने बिबट्याला ट्रॅंक्यूलाईज करणे हा पर्याय स्वीकारला.
 
Leopard rescue in Nagpur
संग्रहित फोटो 
 
काही मिनिटांतच विशेषज्ञ अधिकाऱ्यांनी अचूक लक्ष्य साधत बिबट्याला डार्ट मारला. औषधाचा परिणाम होऊन बिबट्या शांत झाल्यावर वनपथकाने योग्य अंतर राखत त्याला जाळीत सुरक्षित पकडले आणि नंतर पिंजऱ्यात हलवले. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान दक्षता राखत कोणतीही जीवितहानी होऊ नये याची काळजी घेण्यात आली.
 
बिबट्याला पुढील उपचारांसाठी वनविभागाच्या वाहनातून रेस्क्यू सेंटरला हलवण्यात येणार असून, त्याची प्रकृती तपासल्यानंतर तो पुन्हा जंगलात सोडण्यात येईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, नागपूर परिसरात आणि राज्यातील अजारा, सांगली आदी भागांत अलीकडेच बिबट्यांच्या वावराच्या घटना समोर आल्याने वनविभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे.