शेकर्‍यांच्या मदतीला आता ‘महाविस्तार’ अ‍ॅप

-हवामानातील बदल; बाजारभाव कळणार -शेतकरी प्रश्नही विचारू शकणार

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
गोंदिया, 
mahavistar app शेतकर्‍यांना हवामानातील बदल, बाजारपेठेतील अस्थिरता आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने ‘महाविस्तार’ हे एआय प्रणालीवर आधारीत अ‍ॅप विकसीत केले आहे. शेतकर्‍यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॅट देण्यात आला असून या चॅटबॅटला शेतकरी प्रश्न विचारु शकतात. त्याची उत्तरे चॅटबॅट काही सेंकदात शेतकर्‍यांना देतो. महाविस्तार अ‍ॅपमधून शेतकर्‍यांना शेतीपूरक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
 
 
महाविस्तार अँप
 
 
हवामान बदलाच्या संकटामुळे शेतकर्‍यांसमोर नवनवीन आव्हाने निर्माण होवू लागली आहेत. त्यामुळे हवामान बदलांना तोंड देण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. गोंदिया जिल्ह्यातील सुमारे ६३२२ पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी या अ‍ॅपचा वापर सुरु केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाची कास धरली आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानावर आधारीत आणि शेतकर्‍यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून महत्वाची भूमिका बजावत असलेले महाविस्तार अ‍ॅप शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय ठरू लागले आहे. अ‍ॅपचा वापर करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा दिवसेंदिवस कल वाढत चालला आहे. महाविस्तार अ‍ॅपमध्ये हवामान अंदाज, शेतीतील लागवड, लागवडीची पध्दत, कीड व्यवस्थापन, कीड व्यवस्थापनाच्या पध्दती बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीक सल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था आणि डीबीटीवरील योजनांची माहिती अ‍ॅपवर मिळते. हे अ‍ॅप शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे अ‍ॅप शेतकर्‍यांना रिअलटाईम माहिती, तज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतीचे मार्गदर्शन करते. महाविस्तार एआय अ‍ॅपमधील चॅटबॅट शेतकर्‍यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देते. रिअल टाईम हवामान अंदाज, स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे योग्य नियोजन करु शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव, रिअल टाईमध्ये दाखवते. कृषी विभागाच्या विविध कृषी योजनांची माहिती, अनुदान आणि विमा योजनांचे तपशील एकाच ठिकाणी मिळू शकणार आहेत. महाविस्तार एआय अ‍ॅप शेतकर्‍यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे घेवून आले आहे.
चॅटबॅट म्हणजे काय...
चॅटवॅट एक संगणकीय प्रणाली आहे. यामध्ये संवाद करण्याची क्षमता विकसीत करण्यात आली आहे. हा संवाद मजकुराद्वारे किंवा आवाजाद्वारे केला जातो. चॅटवॅटसचा उपयोग विविध सेवा देण्यासाठी प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, मदत करण्यासाठी किंवा विशिष्टकाम पूर्ण करण्यासाठी केला जातो.mahavistar app रूल बेस्ड आणि एआय बेस्ड चॅटबॅट दोन प्रकार आहेत. महाविस्तार चॅटवेंट एआय बेस्ड आहे. यामध्ये वेळ आणि श्रम वाचतो. शेतकर्‍यांना २४ तास सेवा मिळते.
अ‍ॅपसाठी फार्मर आयडी आवश्यक
अ‍ॅप चालविण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे. फार्मर आयडी नसल्यास अ‍ॅप कुचकामी ठरणारे आहे. फार्मर आयडीत शेतकर्‍याचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार क्रमांक व बँक खाते, जमिनाचा सातबारा उतारा, शेतीचे क्षेत्रफळ व पिकांची माहिती, शेतकर्‍याने घेतलेले कर्ज किंवा विमा योजना आदीच्या नोंदी केल्या आहे.

महाविस्तार अ‍ॅप शेतकर्‍यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले एक कृत्रिम बुद्धिमत्ता (॒एआय) आधारित डिजिटल सल्लागार अ‍ॅप आहे. हे अ‍ॅप शेतकर्‍यांना शेतीशी संबंधित सर्वसमावेशक माहिती आणि मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘वन स्टॉप सोल्यूशन’ म्हणून काम करते. शेतकर्‍यांनी अ‍ॅपचा लाभ घ्यावा.
- निलेश कानवडे
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गोंदिया