चंद्रपूर,
nomination application जिल्ह्यातील 10 नगर परिषद व एका नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत सोमवारी संपली. एकूण 1666 इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत अनेकांचे स्वप्नभंग झाले. मोठ्या फेरबदलात अनेक दिग्गजांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. अपूर्ण माहिती, आवश्यक कागदपत्रे नसलेले अर्ज बाद झाले.
घुग्गुसच्या 13 अर्जांपैकी 7 अर्ज अवैध
घुग्गुसः घुग्घूस नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 13 अर्जांपैकी 7 अर्ज अवैध ठरले असून, 6 अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण 159 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीनंतर 136 अर्ज वैध ठरले. तर, विविध त्रुटींमुळे 23 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
===
ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदासाठी 5 पैकी 1 अपात्र
ब्रम्हपुरीः या नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीमध्ये मोठे फेरबदल झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या 5 अर्जांपैकी, अरविंद नंदुरकर यांचा अर्ज ‘एबी फॉर्म’ जोडलेला नसल्यामुळे ते अपात्र ठरवण्यात आले. ज्यामुळे नगराध्यक्षपदाच्या लढतीत आता योगेश मिसार, मिलिंद भनारे, निहाल ढोरे आणि सुयोग बाळबुधे हे चार उमेदवार कायम आहे. तसेच, नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 105 अर्जांपैकी 5 अर्ज अपात्र ठरले आहेत, तर 100 अर्ज वैध ठरले आहेत. अपात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग 11 मधील माधुरी उपासे आणि रंजना बुराडे यांचा समावेश आहे, तर सुरज ठवरे (प्रभाग 11 क), छाया वानखेडे (प्रभाग 10 ब), आणि भारती जांभूळकर (प्रभाग 8 अ) यांचेही अर्ज अपात्र ठरले आहेत. या छाननी प्रक्रियेमुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
===
राजुरा नगराध्यक्ष पदासाठी सहाही उमेदवार पात्र
राजुराः उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर राजुरा नगराध्यक्षपदासाठी राधेश्याम अडानीया, अरुण धोटे, राजेंद्र डोहे, विनायक देशमुख, बाबाराव मस्की आणि आदित्य भाके या सहाही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण 88 नामांकन अर्ज दाखल झाले होते, त्यापैकी सीमा मिलिंद देशकर यांचा अर्ज रद्द करण्यात आल्याने आता प्रत्यक्ष 87 अर्ज निवडणुकीसाठी वैध ठरले आहेत.
===
भद्रावती नगराध्यक्ष पदासाठी पैकीच्या पैकी पात्र
भद्रावतीः छाननी प्रक्रियेत नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 7 अर्जांपैकी सर्वच अर्ज पात्र ठरले आहेत तर, नगरसेवक पदासाठी एकूण 181 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 148 अर्ज वैध ठरले आहेत. तर, विविध त्रुटींमुळे उर्वरित 33 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
===
नागभीड येथे 16 पैकी 12 अर्ज पात्र
नागभीडः या नगर पालिकेतील अध्यक्षपदाच्या 16 अर्जांपैकी 12 अर्ज पात्र व 4 अपात्र ठरले आहेत. नगरसेवक पदासाठी एकूण 123 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीनंतर 95 अर्ज वैध ठरले आहेत. तर, 28 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.
===
भिसी नगर पंचायतीत
भिसीः भिसी नगर पंचायतीच्या निवडणूकीतील नगराध्यक्ष पदासाठी दाखल एकूण 15 उमेदवारांपैकी 4 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. एबी फॉर्म प्राप्त न झाल्यामुळे विक्की कटारे, मनोज डोंगरे, आशिष गेडाम यांचा त्यात समावेश आहे. तर संजय राजेश्वर खोब्रागडे यांचा अर्ज सूचकाची पूर्तता न केल्यामुळे अवैध ठरवण्यात आला.nomination application नगरसेवक पदासाठी एकूण 61 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीनंतर 5 पैकी 4 अर्ज एबी फॉर्म प्राप्त न झाल्यामुळे अवैध ठरले तर, एक सूचकाची पूर्तता न केल्यामुळे अवैध ठरले आहे. तर, 56 वैध ठरले आहेत.
====
बल्लारपूर येथील 11 पैकी 11 अर्ज वैध
बल्लारपूरः बल्लारपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाकरिता दाखल झालेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत, नगराध्यक्ष पदाचे अकराही अर्ज वैध ठरले आहेत. नगरसेवकांच्या अर्ज छाननीत काही पक्षांना आणि उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.