श्याम जाधव
दारव्हा,
municipal-council-elections : नगर परिषद निवडणुकीच्या नामांकनाच्या शेवटच्या क्षणाला पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून ऐनवेळी आलेल्या उमेदवाराला संधी दिल्यामुळे भाजपामध्ये प्रचंड नाराजीचा सूर दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीने असा निर्णय घ्यावा आणि निष्ठावंतांना नाराज करावे, अशी प्रतीमा सध्या तयार झाल्याचे दिसत आहे.
पक्षाकडून दारव्हा नगरपरिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेण्यात आले. त्या अनुषंगाने पक्षांमार्फत मुलाखती घेण्यात आल्या व त्यानुसार उमेदवारी सादर करण्यात आल्या. या पक्षाच्या सर्व प्रक्रिया झाल्यानंतरसुद्धा अन्य पक्षाच्या उमेदवारीसाठी सातत्याने मागणी करणाèयांना स्थान देऊन ऐनवेळी भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, यामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचे काय, असा गंभीर प्रश्न व संकोच भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते व निष्ठावान मतदार विचारत आहेत. भाजपा कार्यकर्त्यांचा पक्ष अशी ओळख असताना ऐनवेळी बाहेरून येणाèयांना उमेदवारी द्यावी, हा निर्णय निश्चितच निष्ठावान कार्यकर्ते आणि मतदारांनाही न उलघडणारे कोडे आहे, हे मात्र खरे..!