मुस्लिम राष्ट्रांचा भारताविरोधात मोठा कट

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Muslim nations against India भारताविरोधात काही मुस्लिम राष्ट्रांकडून मोठी रणनीती आखली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारताची गेल्या काही वर्षांत झालेली झपाट्याने प्रगती आणि जागतिक स्तरावर वाढत असलेला प्रभाव शेजारील मुस्लिम देशांना खटकत असून, भारताला कूटनीतिक तसेच संरक्षण पातळीवर अडचणीत आणण्याचे प्रयत्न वाढले असल्याचे संकेत मिळत आहेत. ९ सप्टेंबरला कतारमध्ये इस्रायलविरोधी आपत्कालीन शिखर परिषदेत तब्बल ६० मुस्लिम देश एकत्र आले. याच परिषदेत पाकिस्तान आणि इजिप्तने “इस्लामिक नाटो” किंवा “युनायटेड इस्लामिक मिलिटरी फोर्स” निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या उपक्रमाला प्रखर पाठिंबा दर्शवून भारताविरोधातील या नव्या आघाडीची दिशा स्पष्ट केली.
  
Muslim nations against India
 
भारतातील "ऑपरेशन सिंदूर" नंतर पाकिस्तानने अनेक मुस्लिम राष्ट्रांशी जवळीक वाढवण्यासाठी आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. तुर्की या मोहिमेचा मुख्य नेता ठरत आहे. तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गुलेर जुलै महिन्यात पाकिस्तानला भेट देऊन प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा करून गेले. त्यानंतर तुर्कीने पाकिस्तानशी तब्बल ९०० दशलक्ष डॉलरचा संरक्षण करार केला असून, बायरक्तार TB2 आणि अकिंसी ड्रोनसह अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवण्यास मान्यता दिली आहे. तुर्कीसह अझरबैजान आणि जॉर्डनही पाकिस्तानचे विश्वासू भागीदार मानले जातात. तुर्की नाटोचा सदस्य असल्याने त्याचे पाकिस्तानला मिळणारे पाठबळ अधिक गंभीर मानले जात आहे. जॉर्डन अमेरिकेवर अवलंबून आहे, तर अझरबैजान तुर्कीच्या प्रभावाखाली आहे. या देशांनी भारताविरोधात अप्रत्यक्ष स्वरूपात शत्रुत्वाची भूमिका घेतल्याची चिन्हे दिसतात.
 
संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मेजर जनरल जी. डी. बक्षी यांनी पाकिस्तानच्या हालचाली गंभीर असल्याचे नमूद केले. त्यांच्या मते पाकिस्तान अनेक मुस्लिम देशांना भारताविरोधात उभे करण्याचे प्रयत्न सतत करत आहे. भविष्यात भारत पाकिस्तानवर मोठा सैनिकी दबाव आणेल, अशी परिस्थिती उद्भवल्यास हे मुस्लिम देश पाकिस्तानला शस्त्रास्त्रे, आर्थिक मदत किंवा कूटनीतिक संरक्षण देऊ शकतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर भारताने आपली सैनिकी क्षमता जागतिक स्तरावर सिद्ध केली. यानंतर पाकिस्तानला एकाकीपणाची जाणीव अधिक तीव्र झाली असून, मुस्लिम राष्ट्रांना एकत्र करून भारताला घेरण्याची पद्धतशीर तयारी त्यांच्याकडून केली जात आहे.