सावंगी येथे दुसरी राष्ट्रीय हेल्थकेअर व टेनॉलॉजी शिखर परिषद

दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसी व सीएसआयआरचे आयोजन

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
वर्धा,
national healthcare and technology भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन समितीच्या सहकार्याने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठ संचालित सालोड हिरापूर येथील दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीद्वारे दुसर्‍या हेल्थकेअर अ‍ॅण्डड टेनॉलॉजी शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत ५४० प्रतिनिधी सहभागी झाले होते.
 
 
 
national health care
 
सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या परिषदेचे उद्घाटन एलआयटीयू नागपूरचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांनी केले. अध्यक्षस्थानी मेघे अभिमत विद्यापीठाचे प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. यावेळी कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, मुख्य समन्वयक डॉ. एस. एस. पटेल, संचालक डॉ. तृप्ती श्रीवास्तव, डॉ. जहीरुद्दीन काझी, दत्ता मेघे कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य तथा परिषद संयोजक डॉ. अनिल पेठे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. दीपक खोब्रागडे, डॉ. मनीष देशमुख, सहसंयोजक डॉ. सुरेंद्र अग्रवाल, आयोजन सचिव डॉ. राहुल इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. अतुल वैद्य यांनी संयुत संशोधनाची गरज अधोरेखित करीत पारंपरिक औषधीज्ञानाचे वैज्ञानिक प्रमाणीकरण आणि मानकीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी रिव्हर्स फार्माकॉलॉजी या संकल्पनेवर प्रकाश टाकला. शतकानुशतके वापरल्या जाणार्‍या नैसर्गिक पदार्थांमधून नवीन औषधांचा विकास केला जात असून प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या या उपचार पद्धतींचे वैज्ञानिक सत्यापन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच आयुर्वेद, फार्मास्युटिकल सायन्सेस आणि बहुविषयक संशोधन यांनी एकत्रितरित्या कार्य करून पारंपरिक औषधांचे फायदे आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करावेत, असेही डॉ. मिश्रा म्हणाले. परिषदेचे स्वागतपर भाषण डॉ. अनिल पेठे यांनी यांनी केले, तर डॉ. दीपक खोब्रागडे यांनी आभार मानले.
या परिषदेत एनआयएन हैदराबादचे डॉ. बी. दिनेशकुमार, नागपूरच्या नीरीचे डॉ. सदानंद सोनटके, आयआयटी गुवाहाटीचे डॉ. अनिल लिमये, गोवा येथील जीसीसीपीचे डॉ. शैलेंद्र गुरव, मुंबईच्या आयसीटीचे डॉ. के. एस. ला, जबलपूर येथील जीएसीचे डॉ. मनोजकुमार दश, ग्वाल्हेरचे प्रा. ग्यानचंद्रन ख्यातनाम शास्त्रज्ञांनी आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण आणि बहुविषयक दृष्टिकोनावर विचार मांडले.national healthcare and technology  या परिषदेत २४०हून अधिक शास्त्रीय संशोधन निबंधांचे सादरीकरण करण्यात आले. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गौरव मिश्रा होते. यावेळी सीसीआरएस, नवी दिल्लीचे उपमहानिदेशक डॉ. एन. श्रीकांत यांची उपस्थिती होती.