उमरखेड,
Nitin Shere joins BJP : येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन शेरे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा सुशासन गरीब कल्याणाच्या विचारांनी प्रेरित होऊन, भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला आहे. भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. नितीन शेरे हे अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सक्रीय आहे. रुग्णांना तसेच गरजूंच्या मदतीला ते नेहमीच धाऊन जातात. त्यांनी कोरोना काळात अनेक गरजूंना धान्य मदत केली. तसेच विविध उपक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. आपली पुढील राजकीय वाटचाल भारतीय जनता पार्टीसोबत करायचा संकल्प करित नवनिर्मितीचा ध्यास त्यांनी घेतला आहे.