PM Kisan: तुमच्या खात्यात आले का २००० रुपये? एक क्लिकमध्ये तपासा

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली,
PM Kisan Samman Nidhi : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात आज पीएम-किसान योजनेचा 21 वा हप्ता जमा होणार आहे. ही योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती आणि योजनेअंतर्गत दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ६ हजार रुपये थेट जमा केले जातात. आतापर्यंत २० हप्ते योजनेत जमा केले गेले आहेत, तर आज ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम वितरीत केली जाणार आहे.
 
 
pm kisan yojna
 
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे 21 वा हप्ता देण्याची प्रक्रिया पूर्ण करतील. शेतकऱ्यांना त्यांच्या खाते स्टेटसची माहिती pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या सहाय्याने मिळू शकते. आधार कार्ड खातेाशी लिंक असणे आवश्यक आहे; अन्यथा पैसे जमा होणार नाहीत.
 
जर कोणत्याही शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही, तर त्यांनी प्रथम स्थानिक कृषी अधिकारी किंवा लेखापालाकडे चौकशी करावी. यावर समाधान न झाल्यास पीएम-किसान हेल्प डेस्कवर 011-23381092 किंवा ईमेल pmkisan-ict@gov.in
वर तक्रार नोंदवता येईल. तसेच हेल्पलाइन क्रमांक 1800-115-5525 किंवा 155261 वरूनही मदत मिळवता येईल.