पाेलिस उपनिरीक्षक दीक्षा ताजणे यांच्यावर खंडणी घेतल्याचा आराेप

- न्यायालयाने ताब्यात घेण्याचे दिले आदेश

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
police-sub-inspector-diksha-tajne एका स्कूलव्हॅनचालकाने अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींबाबत अश्लील भाषा वापरुन त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणात एक विद्यार्थी साक्षिदार हाेता. हिंगणा पाेलिस ठाण्यातील पाेलिस उपनिरीक्षक दीक्षा ताजणे हिने त्या साक्षिदार मुलाला गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन 50 हजार रुपयांची खंडणी मागितली. त्याच्या पालकाकडून 20 हजार रुपये घेतले, असा आराेप साक्षिदाराच्या वडिलाने करीत न्यायालयात जबाब दिला. न्यायालयात दिलेल्या जबाबानंतर न्यायाधीशांनी पीएसआय दीक्षा ताजणे हिला ताब्यात घेण्याचे आदेश देऊन याेग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.
 
police-sub-inspector-diksha-tajne
हिंगणा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील काही मुले-मुली अंबाझरी परिसरातील एका नीट क्लासेसमध्ये स्कूलव्हॅनने ये-जा करतात. त्या स्कूलव्हॅनचा चालक लिलाधर याची काही मुलींवर वाईट नजर हाेती. त्यामुळे ताे काही मुलींबाबत ताे अश्लील बाेलत हाेता. त्याचा संवाद एका विद्यार्थ्याने माेबाईलमध्ये रेकाॅर्ड केला. police-sub-inspector-diksha-tajne ताे संवाद मुलींच्या पालकांना ऐकवला. त्यामुळे लिलाधरविरुद्ध हिंगणा पाेलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास हिंगणा पाेलिस ठाण्यातील उपनिरीक्षक ताजणे यांच्याकडे देण्यात आला.
पीएसआय ताजणेवर खंडणीचा आराेप
पाेक्साे गुन्ह्यातील साक्षिदार असलेल्या विद्यार्थ्याला चाैकशीच्या नावाखाली पीएसआय दीक्षा ताजणे हिने हिंगणा पाेलिस ठाण्यात बाेलावले. दिवसभर बसून ठेवल्यानंतर त्याच्या वडिलाला 50 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलाला खाेट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे मुलाच्या पालकाने जुळवाजुळव करुन 20 हजार आणले आणि ताजणेला दिले, असा आराेप मुलाच्या वडिलांनी न्यायालयात केला.
विनयभंग प्रकरणात मंगळवारी आराेपीच्या जामीन अर्जावर सुनावणी हाेती. यातील साक्षीदारही न्यायालयात उपस्थित हाेता. पीएसआय दीक्षा ताजणे हिने पैसे घेतल्याचे न्यायालयाला सांगितले. police-sub-inspector-diksha-tajne ज्येष्ठ सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी न्यायालयाच्या हा प्रकार लक्षात आणून देत कर्तव्य पार पाडले. न्यायालयाने हा गंभीर प्रकार असल्याचे सांगून सदर पाेलिसांच्या मदतीने दीक्षा ताजणे हिला ताब्यात घेण्याचे आदेश दिले.
पीएसआय दीक्षा ताजणेला सदर पाेलिस ठाण्यात आणले. हे प्रकरण हिंगणा पाेलिस हद्दीत घडल्याने संबंधित अधिकाèयांना परिमंडळ एकच्या पथकाकडे सुपुर्द केले, अशी प्रतिक्रिया सदरचे ठाणेदार अमाेल देशमुख यांनी दिली. साक्षीदाराने न्यायालयात दिलेल्या साक्षीनंतर ताजणे यांच्यावरील आराेपाचा वरिष्ठ अधिकाèयांसमक्ष चाैकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया हिंगण्याचे ठाणेदार जितेंद्र बाेबडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. या प्रकरणी डीसीपी सिंगारेड्डी यांनी प्रतिक्रियेसाठी फोन केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.