रामदेवबाबा इथेनॉल संचाला भीषण आग

*जोरदार स्फोटाने ब्रम्हपुरी व जवळची गावे हादरली

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
ब्रम्हपुरी, 
ramdev-baba-ethanol-set-fire : येथील रामदेवबाबा इथेनाल प्लॉन्टमध्ये बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान जोरदार धमाका होवून आग लागली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल येथील अग्नीशमन गाड्यांना पाचारण करावे लागल्याचे वृत्त आहे.
 
 
 
fire
 
 
 
ब्रम्हपुरी तालुक्यातील शहरालगतच्या उदापूर गावाच्या हद्दीत हा इथेनॉल प्लॉन्ट आहे. ब्रम्हपुरीहून बोरगावला मार्गावर असलेल्या या संचाला आग लागण्याआधी प्रचंड मोठा स्फोट झाला. त्यामुळे झिलबोडी, परसोडी, बोरगाव, उदापूर व ब्रम्हपुरी येथे प्रचंंड भितीचे वातावरण आहे.
 
 
रामदेवबाबा सॉलव्हन्टमध्ये सुरवातीला तुलसी राईस ब्रँड तेलाची निर्मिती होत होती. मात्र, अलीकडेच बोरगाव रस्त्याच्या दुसर्‍या बाजुला रामदेवबाबा इथेनॉल प्लॉन्टही सुरू झाला आहे. या संदर्भात अद्याप हाणीबाबत कळू शकले नाही. मात्र, धमाक्यामुळे लगतच्या गावात जोरदार हादरा बसल्याचे वृत्त आहे.