गोविंदराव वंजारी कॉलेजमध्ये अविष्कार स्पर्धेला प्रतिसाद

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नागपूर,
Govindrao Vanjari College गोविंदराव वंजारी अभियांत्रिकी महाविद्यालयात “अविष्कार 2025” झोनल आंतरमहाविद्यालयीन पोस्टर सादरीकरण स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोनेरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत नागपूर, वर्धा आणि अमरावती विभागातील ६७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. समन्वयक प्रा. प्रशांत गुमगावकर यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षक प्रा. सचिन डवाले यांनी विद्यार्थ्यांना संशोधन आणि नवोपक्रमाकडे प्रेरित केले. प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांनी सर्जनशीलता आणि संशोधनाच्या दृष्टिकोनावर मार्गदर्शन केले.
 
Govindrao Vanjari College
 
कृषी, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वाणिज्य, मानवता आणि शुद्ध विज्ञान अशा विविध विभागांतील पोस्टर्सचे १२ ज्युरी सदस्यांनी मूल्यांकन केले. प्रत्येक गटातील सुवर्ण व रौप्य पदक विजेत्यांना प्रमाणपत्रासह पुढील विद्यापीठस्तरीय फेरीसाठी पात्रता मिळाली. Govindrao Vanjari College कार्यक्रमाचे आयोजन झोनल समन्वयक डॉ. राकेश श्रीवास्तव, प्रा. प्रशांत गुमगावकर, प्रा. जयश्री महेंद्रा, शिक्षकवृंद आणि स्वयंसेवकांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गौरी निमजे यांनी केले तर आभार प्रा. अरविंद गणवीर यांनी मानले. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, आमदार अ‍ॅड. अभिजित वंजारी आणि डॉ. स्मिता वंजारी यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाचे कौतुक केले.
सौजन्य: मनोज वैराळकर, संपर्क मित्र