छाननी नगराध्यक्षपदाचे १६, तर नगरसेवकपदाचे १७८ अर्ज रद्द

२१ नोव्हेंबरनंतर होणार चित्र स्पष्ट

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
गोंदिया, 
gondia municipal council तिरोडा व गोंदिया नगर परिषद आणि सालेकसा व गोरेगाव नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज छाननीच्या दिवशी मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी सालेकसा व गोरेगाव नगर पंचायतीत ४३ नामांकन अर्ज रद्द झाले. गोंदिया नगर परिषदेत नगराध्यक्षपदाचे १०, नगरसेवकपदाचे १२३ व तिरोडा येथे नगरसेवकपदाचे १८ नामांकन अर्ज रद्द झाले. आता २१ नोव्हेंबर (अपील नसेल तिथे) नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची तारीख असून, या दिवशी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
 
 
 
 नगराध्यक्षपदा
 
 
 
मुंबई येथील मंत्रालयात ६ ऑक्टोबर रोजी नगर परिषद व नगर पंचायतींच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. यात गोंदिया आणि तिरोडा नगर परिषदेवर नामा प्रवर्गाचे आरक्षण निघाले. गोरेगाव नगर पंचायतीत अनुसूचित जमाती आणि सालेकसा नगर पंचायतीत सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. नामांकन अर्ज दाखल करण्याला १० नोव्हेंबरपासून सुरवात झाली. १७ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केले. गोंदियात नगराध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवकपदासाठी ४०७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले. छाननीत नगराध्यक्षपदाचे १० अर्ज, तर नगरसेवकपदाचे १२३ अर्ज अवैध ठरले. नगराध्यक्षपदाचे ६ अर्ज आणि नगरसेवकपदाचे २८४ अर्ज कायम आहेत. तिरोड्यात नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केलेत. आठही उमेदवार कायम आहेत, तर नगरसेवकपदासाठी नामांकन अर्ज दाखल करणार्‍या ११७ उमेदवारांपैकी १८ अर्ज छाननीत रद्द ठरले. ९९ अर्ज कायम आहेत.gondia municipal council सालेकसा येथे नगराध्यक्षपदासाठी १४ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. पैकी छाननीत ६ अर्ज अवैध ठरले. ८ उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवले आहेत. तसेच नगरसेवकपदासाठी ९१ नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २१ अर्ज रद्द झाले असून ७० उमेदवारांनी नामांकन अर्ज कायम ठेवलेत. गोरेगाव येथे नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. आठही उमेदवार कायम आहेत, नगरसेवकपदाकरिता ८४ उमेदवारांपैकी १६ नामांकन अर्ज रद्द ठरले. ६८ उमेदवारांचे नामांकन अर्ज कायम आहेत. २१ नोव्हेंबर (अपील नसेल तिथे) नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख असून या दिवशी लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
असा असेल पुढील कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपील नसेल तिथे) १९ ते २१ नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत, अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल, त्या तारखेनंतर तिसर्‍या दिवशी किंवा तत्पूर्वी. मात्र, २५ नोव्हेंबरपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा व तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक २६ नोव्हेंबर, मतदानाचा दिनांक २ डिसेंबर, मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक ३ डिसेंबर.