सोमवारपासून नागपुरातून एकता रॅली

:खा. तेजस्वी सूर्या यांची माहिती

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नागपूर, 
unity-rally-from-nagpur : देशाचे माजी गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभाई पटेल यांच्या दीडशेव्या जन्मदिनानिमित्त केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे ‘सरदारऽ 150 ’ही एकता रॅली (युनिटी मार्च) 24 नोव्हेंबरला नागपूरसह मुंबई, दिल्ली व जयपूर येथून काढली जाणार असल्याची माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. तेजस्वी सूर्या यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
 

19nov1740 
 
 
 
त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिनी 26 नोव्हेंबरला युनिटी मार्च निघणार असून 6 डिसेंबरला गुजरातमधील आणंद येथून पदयात्रा निघणार आहे. समारोप 6 डिसेंबरला केवडिया येथील सरदार पटेलांच्या भव्य पुतळ्याजवळ होईल.
 
 
तत्पूर्वी, 24 मार्चला नागपूर, मुंबई, दिल्ली व जयपूर येथून बसने यात्रा सुरू होईल. या चार ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील राज्यांमधील प्रत्येक जिल्ह्यातून भाजयुमोचे 2-3 पदाधिकारी सहभागी होतील. एकूण 195 जिल्ह्यातील 400पेक्षा जास्त पदाधिकारी 11 बसेसमधून यात्रेत सहभागी होतील.
 
 
नागपूरहून यात्रा बैतुल, इंदोरमार्गे गुजरातला पोहोचेल. मुळात ही प्रेरणा यात्रा आहे. मार्गात बिरसा मुंडा व इतर आदिवासी हुतात्म्यांबद्दल माहिती दिली जाईल. विविध महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा, सायंकाळी व्यापाèयांसोबत चर्चा, सर्वसामान्य जनतेशी चर्चा, सायंकाळी स्थानिक संस्कृतीची ओळख करून देणारा सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात्रेचे भव्य स्वागत करावे, असे आवाहन खा. तेजस्वी सूर्या यांनी केले.
 
 
भाजपाचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री आ. विक्रम पाटील, कपील परमार, यश शर्मा, भाजयुमोचे महानगर अध्यक्ष सचिन करारे, रितेश रहाटे, महामंत्री रितेश पांडे, पवन तिवारी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
 
भारतीय तरुण सकारात्मक व रचनात्मक
 
 
भारतीय जेन-झी व इतर देशांमधील जेन-झी यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण, भारतीय तरुण सकारात्मक व रचनात्मक कार्यात गुंतलेले असतात. ते बाह्यशक्तींच्या कटाला बळी पडणे अशक्य आहे. इतर देशांमधील जेन-झी नॉन कन्स्ट्रक्टिव्ह असल्याने
परकीय शक्तींचे ते बाहुले ठरले.
 
नागपूर स्वच्छ
 
 
कर्नाटकातील बंगळुरूपेक्षा नागपूर शंभर पटींनी स्वच्छ असल्याचे विमानतळावरून येताना दिसले. येथे भाजपाची सत्ता आहे म्हणून मी म्हणत नाहीय.
 
 
माझ्या गावाबद्दल असे सांगताना वेदना होत आहेत. पण, कर्नाटकमधील काँग्रेस सरकारच्या दुर्लक्षापायी हे चित्र आहे. काँग्रेस संस्कृतीच चांगली नाही. पण, तेथे भाजपाची सत्ता पुन्हा येईल व बंगळुरू स्वच्छ दिसेल, असे खा. तेजस्वी सूर्या म्हणाले.