तमिळनाडू दौऱ्यापूर्वी PM मोदींना मारण्याची धमकी; DMK नेत्‍याचा VIDEO व्हायरल

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
नवी दिल्ली, 
dmk-leader-threatening-to-kill-pm-modi भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. तथापि, तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकच्या एका नेत्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. द्रमुक नेत्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ पाहून खळबळ उडाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नयनर नागेंद्रन यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले आहे की पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या द्रमुक नेत्याला ताबडतोब अटक करावी.
 
dmk-leader-threatening-to-kill-pm-modi
 
तेनकासी जिल्यात SIR विरोधी आंदोलनादरम्यान DMK चे दक्षिण जिल्हा सचिव जयपालन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अप्रत्यक्षरीत्या जीवघेणी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. dmk-leader-threatening-to-kill-pm-modi जयपालन यांनी मोदींची तुलना नरकासुरशी करत विवादित वक्तव्य केले. त्यांनी म्हटले— "तुमचे मत हिसकावून घेण्यासाठी मोदी तडफडत आहेत. ते दुसरे नरकासुरच आहेत. त्यांचा नायनाट झाला तरच तमिळनाडूचे भले होईल. आपण ही लढाई एकजुटीने लढून विजय मिळवला पाहिजे. तामिळनाडू भाजपपाचे अध्यक्ष नयनर नागेंद्रन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "देशात अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या नेत्याला, विशेषतः जगभरात आदर असलेल्या एका महान नेत्याला, कोणताही आदर किंवा स्टेज शिष्टाचार नसताना, जिवे मारण्याची धमकी देणे, तामिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीबद्दल शंका निर्माण करते. विशेषतः, जिल्हा सचिवांचे क्रूर भाषण न थांबवता तेथे उपस्थित असलेल्या तेनकासीच्या खासदार राणी श्रीकुमार आणि शंकरनकोविल आमदार राजा यांचे मौन संपूर्ण पक्षाच्या हिंसक स्वरूपाचा आणि क्रूरतेचा पर्दाफाश करते. हे टाळण्यासाठी द्रमुक कितीही सबबी काढत असले तरी ते स्वीकारले जाणार नाहीत. मी द्रमुक सरकारला द्रमुक दक्षिण जिल्हा सचिव जयपालन यांना तात्काळ अटक करण्याची विनंती करतो, ज्यांनी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारी विधाने केली."
सौजन्य : सोशल मीडिया 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथील सत्य साई बाबा यांच्या पवित्र मंदिराला भेट देतील. त्यानंतर, ते तामिळनाडूतील कोइम्बतूरला जातील. dmk-leader-threatening-to-kill-pm-modi ते दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषदेचे उद्घाटन करतील आणि पीएम-किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २१ वा हप्ता जाहीर करतील.