वडकी पोलिसांनी केली 22 गोवंशांची सुटका

25 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
rescue-of-cows : वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका ट्रकमध्ये कत्तलीसाठी जाणाèया 22 गोवंशांची वडकी पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत 25 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवार, 17 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
 
 
y18Nov-Govansh
 
 
 
हैद्राबादकडे अवैधरित्या गोधन वाहतुकीच्या माहितीच्या आधारे, राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वर ठिकठिकाणी पथके नेमून केशरी रंगाच्या ट्रकचा शोध सुरू होता. त्याप्रमाणे ट्रक क्रमांक एमएच40 बिएल 3762 नागपूरकडे पळून जाताना आढळला. वर्धा नदीच्या पूलावर दोन्हीकडील वाहतूक ठप्प करून या वाहनाची पंचासमक्ष तपासणी करण्यात आली. या वाहनामध्ये 22 गोवंश प्रत्येकी 25 हजारप्रमाणे एकुण 5 लाख 50 हजार व वाहन किंमत 20 लाख असा एकूण 25 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला.
 
 
गुन्ह्यातील अज्ञात आरोपींवर कलम 325 भारतीय न्यायसंहिता 2023 सह कलम 5, 5 अ. 5 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, सहकलम 11 प्राण्यास क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम आणि कलम 184/177 मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. यातील गोवंश गोशाळेत जमा करण्यात आले आहे.
 
 
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, तसेच सहायक पोलिस अधीक्षक रॉबिन बन्सल यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलिस ठाणेदार सहायक पोलिस निरीक्षक भोरकडे, वाढई, करपते, कोष्टवार, नेवारे व मोतेराव यांनी पार पाडली.