गोंदिया,
Winter in gondia जिल्ह्यासह परिसरात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येत आहे. पारा खाली उतरल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. यंदा पावसाळा अनेक दिवस होता. पाऊस जास्त पडल्याने थंडीही चांगलीच जाणवणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्याप्रमाणे मागील काही दिवसात गोंदिया शहरासह जिल्ह्यातील किमान व कमाल तापमान सातत्याने खाली आले येत आहे. गोंदियातील आज मंगळवारचे किमान तापमान ९.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडीची तीव्रता लक्षणीय वाढली आहे.
थंडी वाढल्यामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागात तसेच शहरांमध्ये जागोजागी नागरिकांनी शेकोट्या पेटवल्याचे दिसून येत आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिक उबदार कपड्यांमध्ये दिसत आहेत. सकाळी उशिरापर्यंत गारव्याची आणि थंड वार्याची जाणीव होत आहे.Winter in gondia थंडीमुळे सर्दी, खोकला आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, थंडीचा शेती पिकावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. पिकांची काळजी शेतकर्यांना घ्यावी लागत आहे. औषध फवारणी वाढली असून रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.