तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
final-mahadeep-exam : यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील 2099 शाळातील इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत शिक्षण घेणाèया विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची व स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी. यासाठी गेल्या पाच वर्षांपासून महादीप या स्पर्धा परीक्षेचे आयोजन सातत्याने जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी जिल्ह्यातील 2776 विद्यार्थ्यांनी अंतिम महादीप परीक्षा दिली आहे.

या महादीप परिक्षेत यशस्वी व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना विमानवारीने विविध राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन तेथील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतीक चालीरीतीचा अभ्यास विदयार्थ्यांना करता यावा. यासाठी ही महादीप परीक्षा महत्व पुर्ण मानली जाते. जिल्ह्यात या परीक्षेला स्पर्धा परीक्षेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात ही परीक्षा अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी निता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे यांच्या नियंत्रणात 18 नोव्हेंबरला जिल्ह्यातील 16 तालुका केंद्रावर तालुकास्तर महादीप परीक्षेची अंतिम फेरी घेण्यात आली.
या तालुकास्तर महादीप परीक्षेच्या अंतिम फेरीला जिल्ह्यातील 16 तालुका केंद्रावर 2776 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यामध्ये मराठी माध्यमाची 2403 आणि उर्दू माध्यमाच्या 373 विद्यार्थ्यांचा सामावेश होता. या तालुकास्तर अंतिम परीक्षेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पात्र विद्यार्थ्यांना जिल्हास्तर परीक्षेसाठी निवड करण्यात येऊन शेवटी जिल्हास्तर परीक्षेतून गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी विमानवारीसाठी पात्र ठरवण्यात येईल.
या तालुकास्तर अंतिम परीक्षेच्या आयोजनासाठी जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तालुका समन्वयक, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी कार्य केले.
परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाच्या अधिकाèयांनी विविध केंद्रांवर भेटी दिल्या. यामध्ये यवतमाळ तालुक्यात जिल्हा परिषद माजी शासकीय माध्यमिक विद्यालय गोधणी रोड यवतमाळ या परीक्षा केंद्राला जिल्हा समन्वयक तथा विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, विस्तार अधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दीपिका गुल्हाने, तालुका समन्वयक प्रीती ओरके, मुख्याध्यापक साहेबराव पवार, सहसमन्वयक राजकुमार भोयर, राजहंस मेंढे यांनी भेट दिली.
आर्णी तालुक्यात उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे यांच्या नियंत्रणात ही परीक्षा घेण्यात आली. इतर सर्व तालुक्यात गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात परीक्षा चोख बंदोबस्तात घेण्यात आली.