दृष्टीदोषावर मात करीत प्रकाशाकडे वाटचाल

    दिनांक :19-Nov-2025
Total Views |
चंद्रपूर, 
Youth for Job ‘युथ फॉर जॉब’ या संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सावंगा विठोबा येथील राजश्री पुरुषोत्तम खोडके (30) या दिव्यांग तरुणी स्वावलंबी झाली. दृष्टीदोषावर मात करीत तिने प्रकाशाकडे यशस्वी वाटचाल केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग युवक-युवतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘युथ फॉर जॉब’ या संस्थेच्या माध्यमातून एक नवे मॉडेल उभारले. दिव्यांगांना रोजगारक्षम करणे, युडीआयडीकरिता दिव्यांगांची 100 टक्के नोंदणी, लक्षित कौशल्य विकास आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी शाश्वत उपजिविका निर्माण करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असून, त्याचा फायदा दिव्यांग नागरिकांना होत आहे.
 
 

युथ फॉर जॉब 
 
 
राजश्री ही 40 टक्के अंशत: अंध (दिव्यांग) असून, तिने वस्त्र विज्ञानमध्ये शिक्षण घेतले. राजश्रीच्या कुटुंबात आई-वडील, एक धाकटा भाऊ आणि तीन मोठ्या बहिणी आहेत. वडील पुरुषोत्तम खोडके पूर्वी बल्लारपूर येथील पेपर मिलमध्ये काम करीत होते आणि आता निवृत झाले आहेत. आई गृहिणी आहेत. राजश्रीचा जन्म अमरावती येथे झाला. परंतु, वडिलाच्या नोकरीमुळे कुटुंब बल्लारपूर येथे स्थलांतरित झाले. लहाणपणीच राजश्रीला त्वचाविकारामुळे दृष्टिदोष झाला. ज्यामुळे तिची दृष्टी कमी झाली. या परिस्थितीमुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, आत्मविश्वासाने तिने वस्त्र विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यांनतर रोजगाराच्या संधी शोधायला सुरवात केली. परंतु, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक कौशल्यांच्या अभावामुळे नोकरी मिळवणे कठीण गेले. जेव्हा तिला ‘युथ फॉर जॉब’ बद्दल महेश मेश्राम यांच्याकडून माहिती मिळाली. राजश्रीने आत्मविश्वासाने एक महिन्याच्या कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतला. प्रशिक्षणादरम्यान राजश्रीने सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय भाग घेतला. तसेच आपल्या सहकार्‍यांना प्रोत्साहन दिले.Youth for Job मदत केली आणि नेतृत्वाचे गुण दाखवले. प्रशिक्षणादरम्यान संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, समस्या सोडवण्याचे तंत्र, कार्यस्थळी शिष्टाचार आणि मुलाखत तयारी यासारखी महत्वाची कौशल्ये तिने आत्मसात केली. या कौशल्यांनी तिचा आत्मविश्वास आणि रोजगारक्षमता वाढण्यास मदत झाली. प्रशिक्षणानंतर राजश्रीने भूपेंद्र गौड टीएम पोषणतज्ज्ञ यांच्याकडे मुलाखत दिली आणि ग्राहक सहाय्यक या पदासाठी तिची निवड झाली. आता ती वार्षिक 1 लक्ष 80 हजार रुपये इतके स्थिर उत्पन्न कमवत आहे, ज्यामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले आहे.