लंडन,
historian-big-claim-about-andrew ब्रिटनच्या राजघराण्याशी संबंधित एका धक्कादायक उघडकीमुळे सध्या ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिटिश राजघराण्यातील इतिहासकार अँड्र्यू लोनी यांनी केलेल्या खुलास्यानुसार, कुप्रसिद्ध राजपुत्र अँड्र्यूने थायलंडच्या अधिकृत दौर्यादरम्यान करदात्यांच्या पैशांचा वापर करून फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अवघ्या चार दिवसांत ४० वेश्यांना बोलावल्या होत्या. ही भेट थायलंडच्या राजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अधिकृत असल्याचे सांगितले गेले होते, मात्र अँड्र्यूने हा दौरा आपल्या वैयक्तिक मौजमजेमध्ये बदलला.

लोनी यांच्या मते, अँड्र्यूकडे कोणत्याही प्रकारच्या नैतिक मर्यादा नव्हत्या आणि तो हे सर्व राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मदतीने करीत असत. या खुलास्यानंतर ब्रिटनचे राजघराणे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना लोनी यांनी प्रिन्स अँड्र्यूच्या भूतकाळातील काळे अध्याय उघड केले. थायलंडमधील राजाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी असलेला प्रवास, अँड्र्यूने सेक्स स्कँडलमध्ये रूपांतरित केला, असे त्यांनी सांगितले. लोनी यांच्या मते, अँड्र्यू आपल्या पदाचा आणि व्यापार दूत म्हणून असलेल्या स्थानाचा गैरवापर करत होते. ते अधिकृत दौर्यांना वैयक्तिक सुट्ट्यांमध्ये बदलत आणि त्यादरम्यान महिलांचा पाठलाग करून स्वतःच्या खिशा भरत. थायलंडमध्ये त्यांनी दूतावासाऐवजी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम केला आणि फक्त चार दिवसांत ४० वेश्यांना बोलावले, यात काही राजनयिकांनी मदत केली होती. historian-big-claim-about-andrew ४१ वर्षांच्या वयात ते ‘मिड-लाइफ क्रायसिस’मधून जात होते आणि करदात्यांचा पैसा उधळत दोन आठवड्यांच्या खासगी सुट्ट्या घेत होते. लोनी यांनी याला “शाही पतनाचा शानदार नमुना” म्हटले आहे.
जानेवारी २०२२ मध्ये वर्जिनिया गिफ्रे यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अँड्र्यूंच्या लष्करी पदव्या आणि शाही संरक्षण काढून घेतले गेले. जेफ्री एपस्टीनशी असलेल्या संबंधांमुळे त्यांची प्रतिमा पूर्णपणे कोसळली. नुकतेच राजा चार्ल्स यांनी त्यांच्याकडील उरलेल्या शाही उपाध्याही परत घेतल्या आणि त्याला रॉयल लॉजमधून हद्दपार केले. historian-big-claim-about-andrew गिफ्रेच्या संस्मरणात आलेल्या नव्या खुलास्यांमुळे ब्रिटनमध्ये जनक्षोभ उसळला आहे. लोनी यांनी आरोप केला की अँड्र्यू आपले व्यावसायिक स्वार्थ साधण्यासाठी राजकीय आणि राजनैतिक पदांचा वापर करत होते. सॅंड्रिंघॅम परिसरातील लोकांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली असून, एक रहिवासी म्हणाला, “तो माणूस भयानक आहे, आम्हाला तो इथे नको!” लोनी यांनी ब्रिटिश राजनयिकांनाही जबाबदार धरत विचारले की त्यांनी या घडामोडींना रोखण्याचा प्रयत्न का केला नाही. अँड्र्यूच्या यौनकेंद्रित दौर्यांनी आणि वैयक्तिक फायद्याच्या हव्यासाने राजघराण्याच्या प्रतिष्ठेला जबर धक्का दिला असून, या प्रकरणामुळे ब्रिटनमध्ये नवा वाद पेटला आहे.