नागपूर,
Belishaupt Railway Colony कामठी रोडवरील बेलिशॉप रेल्वे कॉलनीतील प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात उभारलेलं विदर्भातील सर्वात मोठं तुळशीचं वृंदावन भक्तांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहे. कार्तिक महिन्यानिमित्त मंदिर समिती तर्फे सामूहिक तुळशी विवाह सोहळा पार पडला.
पुजारी पं. राजेश द्विवेदी यांनी वेदमंत्रोच्चारात विवाहविधी संपन्न केला. Belishaupt Railway Colony मुख्य यजमान म्हणून पं. कृष्ण मुरली पांडे सपत्नीक उपस्थित होते. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभाव, संगीत व आनंदाने परिसर दुमदुमला. प्रसाद वितरण आणि आतषबाजीने कार्यक्रमाची सांगता झाली.या वेळी समिती पदाधिकारी, महिला सदस्य आणि मान्यवर उपस्थित होते. हे भव्य तुळशी वृंदावन श्रद्धा, सौंदर्य आणि संस्कृतीचा संगम साकारत विदर्भातील सर्वात विशाल वृंदावन ठरत आहे.
सौजन्य:प्रवीण डबली,संपर्क मित्र