भाजपा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षपदी जय बठीजा

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Jai Bhatija, येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक जय बठीजा यांची भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण यवतमाळ शहर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. पूर्व मंत्री व भाजपा नेते मदनभाऊ येरावार, जिल्हाध्यक्ष अधिवक्ता प्रफुल्लसिंह चौहान, जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, जिल्हा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ गुंदेचा, जिल्हा मंत्री किशोर जोतवानी यांच्या संमतीने व जिल्हा भाजपा कार्यालयात झालेल्या सभेत भाजपाचे दक्षिण शहर विभागाचे अध्यक्ष नितीन गिरी यांनी बठीजा यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.
 

Jai Bhatija, 
यावेळी पूर्व नगरसेवक जगदीश वाधवानी उपस्थित होते. जय बठीजा हे 25 वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. आपण पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनात व्यापारी उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याचा तसेच भाजपाचा संदेश घरोघरी नेण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.