महाराष्ट्राला हादरविणारा खुलासा, मविआचा भांडाफोड?

BJP-press conference-MVA भाजपाच्या पत्रपरिषदेत काय होणार?

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
मुंबई,
 
 
BJP-press conference-MVA राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होताच, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्या सोमवारी (3 नोव्हेंबर) भाजपची पत्रकार परिषद होणार असून, यावेळी काही मोठा खुलासा सत्ताधारी पक्षाच्या वतीने केला जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांकडून माहिती मिळाल्याचे सांगून, अनेक माध्यमांनी यासंबंधित वृत्तांकन केले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार ही पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याचे वृत्त आहे.
 
 
 
BJP-press conference-MVA
 
 
BJP-press conference-MVA  हा खुलासा भाजपावर होणाऱ्या मतचोरीच्या आरोपांबाबत असू शकतो. राज आणि उद्धव या ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांवर शेलार काय गौप्यस्फोट करणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी आरोपांवरून विरोधक आक्रमक असून, काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे एकत्रित रस्त्यावर उतरले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले यांचीही उपस्थिती होती.
 
 
 
BJP-press conference-MVA  जोपर्यंत मतदार याद्यातील घोळ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये अशी भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग यावर नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. शिवाय, उद्या होणाèया पत्रकार परिषदेत भाजपा कोणता गौप्यस्फोट करणार आहे? याकडेही सगळ्यांचं लक्ष लागले आहे.