प्रफुल्ल व्यास
वर्धा,
BJP Wardha जिल्ह्यात पाच आमदार आणि भाजपाचे काम दमदार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कोणतीही रिस नको म्हणत जिल्हा परिषदेसह नगर परिषदांवर भाजपाचाच झेंडा फडकावा यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा वेध घेत भारतीय जनता पार्टीने वर्धा जिल्ह्यात संघटनात्मक तयारीचा धडाका सुरू केला आहे. तालुका, मंडळं आणि गावपातळीवर १८६ ठिकाणी बैठकींचे सत्र राबवले जात आहे. या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश भरल्या जात आहे. भाजपाची निवडणूक तयारी अधिक सशत आणि सर्वसमावेशक रूप घेत आहे.
या बैठकींमध्ये पक्षाचे जिल्हा पदाधिकारी, मंडळ प्रमुख, माजी नगरसेवक, आजी माजी सरपंच, तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहून स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेत आहेत. प्रत्येक गावाच्या, प्रत्येक वार्डच्या अडचणी आणि विकासाच्या संधींची चर्चा करून त्या दिशेने ठोस कार्ययोजना आखण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्यात ६ नगर पालिका, ८२ प्रभाग आणि १०४ पंचायत समिती स्थरावर १८६ बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास १३० बैठकांमध्ये कार्यकर्त्यांना फूल डोज देऊन झाला आहे.
या बैठकींमध्ये सामाजिक समरसता, जातीय एकात्मता आणि सर्व समाजघटकांचा समान सहभाग या मूल्यांवर विशेष भर दिला जात आहे. उमेदवारी ही समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व देणारी आणि सर्वसमावेशक विचारांची असावी, असा संदेश देण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारी ठरविताना सामाजिक संतुलन राखणे, स्थानिक लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचा जनाधार या निकषांचा विचार केला जाणार आहेयाच बैठकांच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी योग्य उमेदवार शोधण्याची मोहीमही जोरात सुरू झाली आहे. बैठकांमध्ये कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत.
कार्यकर्त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावपातळीवर ‘कमळ’ फुलवण्याच्या निर्धाराने अनेक तरुण कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. वर्धा जिल्ह्याच्या राजकीय पटावर भाजपने पुन्हा एकदा संघटनात्मक बळ दाखवले आहे.जिल्हाध्यक्ष संजय गाते म्हणले की, सामाजिक समरसता, विकास आणि पारदर्शकता या तीन मूल्यांवरच आगामी निवडणुकांत आपली रणनीती उभी राहील. या बैठका पूर्ण झाल्यानंतर शती केंद्रांवर बैठकांचे सत्र सुरू होईल. बुथ रचना सशत करण्याचाही या निमित्ताने प्रयत्न आम्ही करतो आहोत. आमच्याकडे पालकमंत्री, ४ दमदार आमदार आहेत. अनुभवी दोन माजी खासदार आहेत. गावागावात नवसंवाद सुरू झाला आहे आणि या संवादातूनच येणार्या काळात भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘कमळ’ फुलवेल, असा विश्वास गाते यांनी व्यत केला.