तभा वृत्तसेवा
बोरीचंद्रशेखर,
Bori, unseasonal rain अतिवृष्टीमुळे परिसरात सोयाबीन पिकाची पूर्णपणे वाट लागली. त्याचवेळी कपाशीच्या झाडावर आलेले बोंडे काळी पडून गळू लागली आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर ही पारंपरिक पिके घेणाèया शेतकèयावर आता अस्मानी संकटांची मालिका सुरू झाली आहे. पावसाच्या या मुसळधार सरींमुळे काही शेतात पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांच्या कापणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास सर्वच महसूल मंडळात मोठे नुकसान झाले. अडाण नदीकाठावरील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
एकाचवेळी कापूस सर्वत्र फुटल्याने वेचणीसाठी मजूर महिला मिळत नाही, नेमक्या याच काळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकèयांच्या हाती येणारा उरला सुरला कापूसही आता हातातून गेला आहे.खरीप हंगामातील पिके शेतकèयांच्या हातून गेली. सरकारने दिवाळीच्या आत शेतकèयांच्या खात्यात पैसा जमा करणार अशी घोषणा केली. काही शेतकèयांच्या खात्यात पैसे जमाही झाले. पण त्यांना केवायसीची अट घातली गेली. सेतु केंद्रावरती केवायसी करण्यासाठी शेतकèयांनी गर्दी केली, सलग तीन ते चार महिन्यापासून केवायसीची साईट बंद असल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित होऊन त्याचा हिरमोड झाला आहे.
ह्यावरती ठोस Bori, unseasonal rain उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.आधी अतिवृष्टी व सततच्या पाऊस तर कधी परतीच्या पावसाने शेतकèयाच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. शासनाने कोणतीही मदत जाहीर केली नसल्याने तारण ठेवून उसनवारी करून शेतकèयांनी यावेळी कशीबशी दिवाळी साजरी केली. अतिवृष्टी मदत शेतकèयांच्या खात्यात जमा करावी, अशी शेतकèयांकडून मागणी होत आहे.