पुण्यात अपघाताचा थरार; कार चक्काचूर, दोन तरुणांचा जागीच मृत्यू!VIDEO

    दिनांक :02-Nov-2025
Total Views |
पुणे,
Pune Accident : शहरातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे एक हादरवणारी दुर्घटना घडली. बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ फोक्सवॅगन पोलो कारचा भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
 
Pune Accident
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारास काळ्या रंगाची पोलो कार भरधाव वेगाने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने गाडी थेट बस स्टॉपवर आदळली. धडकेचा आवाज इतका जोरदार होता की कारचा पुढचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. परिसरात क्षणात गोंधळ माजला.
 
स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस दाखल होताच त्यांनी जखमींना रुग्णालयात हलवलं. दुर्दैवाने, ऋतिक भंडारे आणि यश भंडारे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी आहे.
 
 
 
सौजन्य: सोशल मीडिया
 
पोलिसांच्या तपासात अपघातग्रस्त गाडीच्या डिक्कीतून दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे या तरुणांनी मद्यप्राशन करून गाडी चालवली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, त्यात अपघाताचा थरार स्पष्टपणे दिसत आहे.
 
या भीषण दुर्घटनेने पुणेकरांना हादरवून सोडलं असून, शहरात पुन्हा एकदा “वेग आणि बेजबाबदार ड्रायव्हिंग” वर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.